‘पुरुषांनाही पिरियड्स असायला पाहिजे होते’,…मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आदेशावर असे का म्हणाले सुप्रीम कोर्ट ?

मध्य प्रदेशातील हायकोर्टाने महिला सत्र न्यायाधीशांना बरखास्त करण्याच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने कोरडे ओढले आहेत. महिलां जसेसच्या गर्भपातानंतर त्यांच्या मानसिक अवस्थेचा देखील हायकोर्टाने विचार केलेला नाही अशी टीका सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.बी. व्ंही. नागरत्ना यांनी केलेली आहे.

'पुरुषांनाही पिरियड्स असायला पाहिजे होते',...मध्य प्रदेश हायकोर्टाच्या आदेशावर असे का म्हणाले सुप्रीम कोर्ट ?
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 11:09 PM

सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका निकालावर टीका करीत पुरुषांनाही मासिक धर्म असायला हवा होता अशी संतप्त टिपण्णी केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने एका महिला न्यायाधीशांना तिची कामगिरी निराशाजनक असल्याने बडतर्फ केले होते. गर्भपातामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा हा निकाल देताना कोणताही विचार केलेला नसल्याचे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्या.बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सिव्हील जजेसच्या बर्डतर्फीचे मानदंड काय आहेत याचे स्पष्टीकरण मध्य प्रदेश हायकोर्टाकडून मागितले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार न्यायाधीश जस्टीस नागरत्ना यांनी महिला न्याय अधिकाऱ्याच्या आकलनावर अनेक प्रश्न उपस्थित करीत टिपण्णी केली, ज्यात गर्भपातामुळे झालेले मानसिक आणि शारीरिक आघाताला नजरअंदाज केले गेले. ते म्हणाले की मला आशा आहे की पुरुष जजेसवर देखील हे मापदंड लागू करायला हवे.असे म्हणायला मी जराही कचरणार नाही की एक महिला गर्भवती झाली आणि तिचा गर्भपात झाला आहे. गर्भपाताने महिलेची मानसिक अवस्था आणि शरीरावर झालेला आघात हे काय असते? आम्हाला वाटते की पुरुषांनाही मासिक धर्म असता तर त्यांना कळले असते हे काय आहे ?’

सहा महिला सिव्हील जजेसना बडतर्फ

मध्य प्रदेश राज्य सरकारने कथित असमाधानकारक कामगिरीमुळे सहा महिला सिव्हील जजेसना बडतर्फ केले होते. याची ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली होती. दरम्यान, मध्य प्रदेश हायकोर्टाने १ ऑगस्ट रोजी आपला आधीच्या प्रस्तावावर फेरविचार करीत चार महिला अधिकाऱ्यांना ज्योती वरकडे, सोनाक्षी जोशी, प्रिया शर्मा आणि रचना अतुलकर जोशी यांना काही अटींवर पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. तर दोन अन्य अधिकारी आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी यांना या निर्णयाच्या बाहेर ठेवले.

हे सुद्धा वाचा

कामगिरी घसरत गेली

सर्वोच्च न्यायालय या महिला जजेसच्या प्रकरणांवर सुनावणी घेत होते. आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी ज्या अनुक्रमे २०१८ आणि २०१७ मध्ये मध्य प्रदेशातील न्यायालयात सेवेत दाखल झाल्या होत्या. शर्मा यांची कामगिरी साल २०१९-२० दरम्यान चांगली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी घसरत गेली रेटींग खराब झाले. साल २०२२ मध्ये त्यांच्याकडे १,५०० प्रलंबित प्रकरणे होती. त्यांचा निपटारा २०० पेक्षा कमी होता असा आरोप होता. दुसरीकडे आदिती कुमार शर्मा यांनी हायकोर्टाला २०२१ मध्ये गर्भपात झाल्याचे आणि त्या्नंतर भावाच्या कॅन्सर निदानाबाबतही कळविले होते.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.