शिवसेना भवन कुणाचे? ठाकरे गटाच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल; काय घडलं कोर्टात?

शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेनेचा निधी कुणाकडे राहणार? अशी चर्चा होती. सर्वोच्च न्यायालयात एक याचिका आल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगली होती. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.

शिवसेना भवन कुणाचे? ठाकरे गटाच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल; काय घडलं कोर्टात?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 11:59 AM

नवी दिल्ली : ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. शिवसेना भवनासह पक्षाचा निधी आणि शिवसेना शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. एका वकिलाने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याचिका करणाऱ्या वकिलालाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.

अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत उद्धव ठाकरे गटाकडे असलेलं शिवसेना भवन, शिवसेनेचा निधी आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली होती. गिरी यांच्या या याचिकेने सर्वांची झोप उडाली होती. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर कोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळूनच लावली नाही तर या वकिलाला खडेबोलही सुनावले आहेत.

हे सुद्धा वाचा

तुम्ही कोण?

शिवसेना पक्षाच्या मालमत्ते बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत ही सुनावणी होती. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्या वकिलाची याचिका फेटाळून लावत दणका दिला. तसेच संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.

चर्चांना पूर्णविराम

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. शिंदे आणि 40 आमदारांनी बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. मधल्या काळात शिंदे गटाने पक्षाचं चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेतल्यानंतर शिंदे गटाला चिन्ह आणि पक्षाची मान्यता दिली होती. त्यामुळे शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेनेचा निधी कुणाकडे राहणार? अशी चर्चा होती. शिंदे गटाने मात्र, आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र, अॅड. गिरी यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली होती. आज त्यावरही पडदा पडला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.