नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना संरक्षण देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही कुठे आहात हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत संरक्षण मिळणार नाही, असं कोर्टाने सांगितलं. तर, मला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली तर मी खड्ड्यातून बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंग यांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून सिंग यांनी संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने हे संरक्षण देण्यास नकार दिला आहे. सिंग कुठे आहेत हे जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण दिलं जाणार नाही. ते देशात आहेत? देशाच्या बाहेर आहेत? की आणखी कुठे आहेत? असा सवाल कोर्टाने केला. जस्टिस संजय किशन कौल यांनी हा सवाल केला. तुम्ही कोणत्याच चौकशीत सामिल झाला नाहीत. तरीही तुम्हाला संरक्षणाचा आदेश हवा आहे. आमची शंका चुकीची असू शकते, पण तुम्ही जर परदेशात असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला संरक्षण कसे देऊ शकतो? असा सवाल कोर्टाने केला. तसेच तुम्ही कुठे आहात हे 22 नोव्हेंबर रोजी सांगा, असंही कोर्टाने म्हटलं आहे. या सर्व प्रकरणावर परमबीर सिंग यांनी तुम्ही श्वास घेण्यास मोकळीक दिली तर मी खड्ड्यातूनही बाहेर येईल, असं सांगितलं आहे. आता या प्रकरणावर 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
परमबीर सिंग, पाच पोलीस आणि इतर दोघांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी एका बिल्डरने हा एफआयआर दाखल केला आहे. त्यात सिंग यांच्यावर 15 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करत आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्रं वॉरंटही जारी करण्यात आलं आहे. मात्र, अद्याप पर्यंत सिंग हे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 18 November 2021 pic.twitter.com/agMSejUIpw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
संबंधित बातम्या:
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवाल