सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसद रत्न पुरस्कार, अभिनंदन आत्या..! पार्थ पवार यांचं खास ट्विट
फाऊंडेनशनने एकूण 11 खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule), श्रीरंग बारणे, फौजिया खान आणि हिना गावीत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्यावतीनं देण्यात येणारे संसदरत्न पुरस्कार (Sansadratna Awards) जाहीर झाले आहेत. प्राईम पॉईंट फाऊंडेशनकडून (Prime Point Foundation) 2022 साठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. फाऊंडेनशनने एकूण 11 खासदारांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule), श्रीरंग बारणे, फौजिया खान आणि हिना गावीत यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे आणि रिवॉल्यूशनरी सोशालिस्ट पार्टीचे खासदार एन.के. प्रेमचंद्रन यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा या पुरस्कारावरं नाव कोरलं आहे. सुप्रिया सुळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ट्विटकरुन अभिनंदन केलं आहे.
महाराष्ट्र राज्यातील 4 खासदारांना पुरस्कार
प्राईम पॉईंट फाऊंडेशननं 2022 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील 11 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, फौजिया खान, हिना गावित यांना पुरस्कार देण्यात आलाय. प्राईम पॉईंटतर्फे देण्यात येणारा पुरस्कार हा खासगी संस्थेचा पुरस्कार आहे, सरकारचा नाही.
सुप्रिया सुळे यांना सातव्यांदा पुरस्कार
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सुप्रिया सुळे यांनी सलग सातव्यांदा प्राईम पॉईंट फाऊंडेशनकडून देण्यात येणारा पुरस्कार पटकावला आहे. यानिमित्त त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
पार्थ पवार यांचं ट्विट
Congratulations Aatya @supriya_sule on being named as one of the recipients of Sansad Ratna Award once again. You have always been a voice of reason and a picture of grace in the Parliament. Thank you for being such an inspiration for us. pic.twitter.com/h6sHPribDJ
— Parth Pawar (@parthajitpawar) February 22, 2022
पार्थ पवार काय म्हणाले?
सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करुन अभिनंदन केलं आहे. अभिनंदन आत्या, तुम्हाला पुन्हा एकदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहात,असं पार्थ पवार म्हणाले आहेत.
कोणत्या खासदारांना पुरस्कार मिळाला?
लोकसभेतील सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, हीना गावीत, सुगाता रॉय, कुलदीप राय शर्मा, बिद्युत महातो, सुधीर गुप्ता यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, अमर पटनाईक, फौजिया खान, के.के. रागेश यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार सुरु करण्यात आले होते.
सुप्रिया सुळे यांचं ट्विट
Humbled to be awarded Sansad Ratna Award for Parliamentary Performance Seventh Time in a row. The award is given by Prime Point Foundation & PreSense.
I am grateful to the people of Baramati Loksabha Constituency and my party @NCPspeaks for their support. https://t.co/hIDq4MXBqT
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2022
इतर बातम्या
Video | सदावर्तेंकडून राऊतांची नक्कल! ‘नो क्वेशन आन्सर’वर म्हणाले, लाज वाटायली काय?
घर मिळवण्यासाठीचा संघर्ष लक्षात ठेवा, घरं विकून, मुंबई सोडून जाऊ नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन