प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात?; सुप्रिया सुळेंचा सवाल

नवी दिल्लीः खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज थेट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात, असा सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेले भाषण चांगलेच गाजते आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून धावून मदत केली. मला कोरोना […]

प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात?; सुप्रिया सुळेंचा सवाल
सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 12:43 PM

नवी दिल्लीः खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज थेट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात, असा सवाल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेले भाषण चांगलेच गाजते आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून धावून मदत केली. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. एक महिला तिच्या मागे बॅग होती. त्यावर मूल झोपलं होतं. वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै, मला पंतप्रधानांना तोच सवाल करायचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असं कसं बोललात. त्यांनी थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तरी मी कबूल केला असता. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागतेय. तुम्ही का म्हणून असा आरोप केला. का तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात, ही एक प्रांजळ महिला पंतप्रधानांकडे न्याय मागतेय, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

मला प्रचंड वेदना झाल्या

सुप्रिया म्हणाल्या की, मोदींचं भाषण दीड तासाचं होतं. खूप अपेक्षने पाहत होते. देश अडचणीतून चालला आहे. पंतप्रधानांनी दिशा द्यावी. राज्यांनी कसं करावं, जीएसटीच्या एका टप्प्यावर आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरते आहे. नव्या नोकऱ्या निर्माण होत नाहीत. एक स्टेट्समन म्हणून ते काही मार्गदर्शन करतील असं वाटत होतं. राज्याबद्दल जे बोलले ते दुःख देणारी गोष्ट होती. मला प्रचंड वेदना झाल्या.

महाराष्टातील मतदारांचा अपमान

सुप्रिया म्हणाल्या की, आपल्या महाराष्ट्राबद्दल मोदी असं का बोलत आहेत. 18 खासदार भाजपला राज्याने दिले. मोदी पंतप्रधान आहेत. त्यात महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहेत. त्यांनी मतदारांचा अपमान केला. कोविड स्प्रेडर म्हणून अपमान केला. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी असं विधान केलं. त्यामुळं दुःख झालं. ती पक्षाची पोस्ट नाही. ती संविधानिक पोस्ट आहे. ते देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचं विधान दुःखदायक असल्याचं त्या म्हणाल्या.

महामारीत माणुसकी विसरलात

सुप्रिया म्हणाल्या की, पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी आहे. हरीश भाई द्विवेदी यांनी संसदेत भाषण केलं. ते स्वतः म्हणाले श्रमिकांच्या ज्या ट्रेन होत्या, त्याला ट्रेनने पोहोवण्याचं काम त्यांनी म्हटलं. केंद्रची लिस्ट केंद्राची आहे. गोयल यांचे ट्विट आहेत. फडणवीसांचं ट्विट आहे. हरिश द्विवेदी यांनी मागच्या आठवड्यात श्रेय घेतलं. महामारीत माणुसकी विसरलात तुम्ही. पंजाब आणि उत्तर प्रदेशावर बोलले. इतर राज्यांवर पंतप्रधान बोललेच नाही. पंजाब ही संताची भूमी आहे. त्यांचं आपलं नातं जवळचं आहे. उत्तर प्रदेशाची आपलं नातं आहे. चंद्रशेखर यांचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम होतं. ते पंतप्रधान होऊन गेले. त्यांच्याशी आपले घनिष्ट संबंध. यूपी-बिहारचे लोक आपल्याकडे येतात. पण आपल्यात आणि त्यांच्यात अंतर आणण्याचं काम पंतप्रधानांच्या भाषणातून होऊ शकतं हे मला धक्कादायक आणि दुर्दैवी वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.

इतर बातम्या

Nagpur | केंद्र सरकारने मजुरांना वाऱ्यावर सोडले, आम्ही त्याच मजुरांना ट्रेनने घरी सोडले; विजय वडेट्टीवार यांचा पंतप्रधानांवर पलटवार

Valentine’s Day | तुमच्या जोडीदाराला फिरण्यासोबतच टेस्टी फूडची ही आवड आहे, तर मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.