डिसमिस… केवळ एका वाक्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळली; आता हायकोर्टात जावं लागणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी राहुल गांधी यांनी याचिकेतून केली होती.

डिसमिस... केवळ एका वाक्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळली; आता हायकोर्टात जावं लागणार
Rahul GandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 2:13 PM

सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी सरनेम प्रकरणी मानहानीच्या खटल्यात सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची ती याचिका फेटाळून लावली आहे. डिसमिस.. असा एकच शब्द उच्चारत न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी यांना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. उद्याच राहुल गांधी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

23 मार्च रोजी राहुल गांधी यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी 3 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यता यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली होती. मात्र, कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा झटका दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पर्याय आहेत

सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली असली तरी राहुल गांधी यांच्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय आहेत. सेशन कोर्टाकडून याचिका फेटाळून लावणं याचा अर्थ मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय लागू राहील. कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम राहिली आहे. त्यामुळे आता त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. उच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर मग मात्र राहुल गांधी यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार आहेत.

काय आहे प्रकरण?

2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी मोदी सरनेमवरून टीका केली होती. सर्वच चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल त्यांनी केला होता. त्याला गुजरातचे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत सूरत कोर्टात याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या विधानाने मोदी समाजाचा अपमान झाल्याचं पूर्णेश मोदी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तर मी एक राजकारणी आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो. मी हे विधान हेतूपूर्वक केलेलं नाही. कोणत्याही समाजाला उद्देशून केलेलं नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने या प्रकरणी चार वर्षानंतर निकाल देत राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.