जत्रेतील थरारक व्हिडिओ; अचानक आकाश पाळणा कोसळला आणि…
पाळणा कोसळल्यानंतर मैदानात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. आकाश पाळणा थेट जमीनीवर आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
मोहाली : पंजाबमध्ये एक थरारक घटना घडली आहे. मोहालीत दसरा मैदानावर भरलेल्या जत्रेत एक विचित्र घटना घडली. जत्रेतील आकाश पाळणा अचानक कोसळला. आकाश पाळण्यातील 12 ते 20 लोक जखमी. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पाळणा कोसळताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाळणा कोसळल्यानंतर मैदानात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. आकाश पाळणा थेट जमीनीवर आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा पाळणा जमीनीवर आपटल्यानंतर पाळण्यात बसलेले लोक बाहेर पडल्याचे थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Terrifying incident at a fair in #Mohali. Several injured. More inputs awaited. @puneetpareenja reports pic.twitter.com/6irNspSr8D
— Laasiya Priya | లాస్య (@laasiyapriya) September 4, 2022