विदारक! सिव्हिल इंजिनिअर तरुणावर चप्पल शिवण्याचं काम करण्याची नामुष्की, नोकरी मिळाली होती, पण…

सरकारी नोकरी मिळाली, तर समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळेल आणि मी घेतलेल्या शिक्षणाला न्यायही मिळेल, असं कार्तिकने म्हटलंय.

विदारक! सिव्हिल इंजिनिअर तरुणावर चप्पल शिवण्याचं काम करण्याची नामुष्की, नोकरी मिळाली होती, पण...
मोची म्हणून काम करणारा सिव्हिल इंजिनिअरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 3:20 PM

तामिळनाडूतील  एका तरुणानं इंजिनिअरींगचं (engineering Education) शिक्षण घेतलं. पण तरिही त्याला चप्पल शिवण्याचं काम करावं लागतंय. योग्य पगाराची नोकरी मिळत नसल्यानं अखेर या इंजिनिअर तरुणानं आपल्या वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवण्याचं ठरवलं. समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून या तरुणाच्या आई वडिलांना त्याला सिव्हिल इंजिनिअर बनवलं. त्याच्या उच्च शिक्षणाचा (Higher Education) आर्थिक भार उचलला. शिक्षणही यशस्वीरीत्या तरुणानं पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणाला चांगल्या पगाराची नोकरी लागेल, अशी अपेक्षा होती. पण नोकरी अगदी तुटपुंज्या पगाराची मिळाल्यानं या तरुणानं अखेर चप्पल शिवण्याचं काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तामिळनाडूतील (Tamil Nadu) शिवगंगा जिल्ह्यात चप्पल शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणामुळे इंजिनिअर झालेल्या तरुणांच्या नोकरीच्या मुद्दा अस्वस्थ करणारा आहे.

कार्तिकची हतबलता

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यात कार्तिक राहतो. त्याचं सिव्हिल इंजिनिअरींगपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय. कार्तिकला शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीही लागली होती. अवघ्या चार ते पाच हजार रुपयांची नोकरी त्याला मिळाली होती. पण एवढ्या पैशांत महिना काढणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे मला नोकरी सोडावी लागली. अखेर मी आता माझ्या बापाचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मोची व्यवसाय करण्यास हतबल झालोय, असं कार्तिकने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न

आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी कार्तिकने विनंती केली. सरकारी नोकरी मिळाली, तर समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळेल आणि मी घेतलेल्या शिक्षणाला न्यायही मिळेल, असं कार्तिकने म्हटलंय. आता त्यानं केलेल्या विनवणीला सरकार नेमकं कशा प्रकारे प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचंय.

उच्च शिक्षण घेतलेल्या प्रत्येकालाच नोकरी मिळत नाही, हे देखील एक विदारक सत्य यानिमित्तानं समोर आलंय. तसंच चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्यानं अनेकांना आपल्या उच्च शिक्षणाचा काय फाय फायदा? असं वाटतं. त्यातून काही जण नोकरी सोडतात. तर काही जण तडजोड करत पर्याय नसल्यानं नोकरी करत राहतात. दरम्यान, आता कार्तिकच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.