तामिळनाडूत गांधी, नेहरु आता स्टालिनला रिपोर्ट करणार! राज्याचा कारभार कसा हाकला जाणार?
एम. के. स्टालिन यांनी आपल्या मंत्रिमंडळात 34 मंत्र्यांनी निवड केली आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत!
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत DMKने दमदार विजय मिळवला आहे. DMKचा संपूर्ण कार्यभार सध्या करुणानिधी यांचा मुलगा MK स्टालिन सांभाळत आहेत. शुक्रवारी स्टालिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची कमान आपल्या हाती घेतली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात 34 मंत्र्यांनी निवड केली आहे. या मंत्रिमंडळात नेहरु, गांधी, स्टालिन असे सर्वजण एकत्र काम करणार आहेत! इतकंच नाही तर गांधी आणि नेहरु आता स्टालिन यांना रिपोर्ट करणार आहेत! (The Tamilnadu cabinet includes Stalin, Gandhi and Nehru)
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टालिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथविधी समारोहासोबतच त्यांनी स्टालि यांच्या मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब केलं. MK स्टालिन यांची पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. स्टालिन यांनी के. एन. नेहरु यांना नगरपालिका परिषद प्रशासन विभागाचा कारभार दिला आहे. तर गांधी यांच्याकडे हथकरधा, खादी ग्रामोद्योग मंत्री बनवण्यात आलं आहे.
कोण आहेत आर. गांधी?
आर. गांधी हे DMKच्या तिकिटावर 1996 मध्ये पहिल्यांदा रानीपेट विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर तसंच अन्य DMK नेत्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.
के. एन. नेहरु कोण?
दुसरीकडे, के. एन. नेहरु हे DMKचे मुख्य सचिव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तिरुची पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर पोहोचले आहेत. के. एन. नेहरु यांच्या नावामागे नेहरु यासाठी आहे कारण त्यांचे वडील कट्टर काँग्रेसी होते. तसंच ते जवाहरलाल नेहरु यांचे चाहते होते. मात्र, 1960 च्या दशकापासून त्यांच्या परिवाराने काँग्रेसचा हात सोडत DMK च्या माध्यमातून राजकारण सुरु केलं. 1989 मध्ये पहिली निवडणूक लढण्यापासूनच के.एन. नेहरु हे पक्षाचा मोठा आधार राहिले आहेत.
एम. के. स्टालिन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या स्टालिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टालिन लावण्यात आलं. करुणानिधी यांनी स्टालिन यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना आपला भाऊ अलागिरी यांच्याशी सत्तासंघर्ष करावा लागला होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2018मध्ये स्टालिन यांची DMKच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संबंधित बातम्या :
ममता बॅनर्जी असा ‘खेला’ करतील माहिती नव्हतं, हिंसाचारानं Direct Action Day ची आठवण करुन दिली – भाजप
The Tamilnadu cabinet includes Stalin, Gandhi and Nehru