नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

राहुल गांधी यांनी बिहारमध्ये चांगला प्रचार केला. कपिल सिब्बल यांचं वक्तव्य योग्य नाही, असंही तारिक अन्वर म्हणाले.

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 1:05 PM

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी हिंमत दाखवावी, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सत्तांतर घडू शकते, असं आवाहन काँग्रेस नेते तारिक अन्वर (Tariq Anwar) यांनी केलं आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीका करणाऱ्या कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनाही अन्वर यांनी उत्तर दिलं. (Tariq Anwar appeals Nitish Kumar to show courage and join hands with Congress)

ज्याप्रमाणे भाजपसोबत मुख्यमंत्रिपदावरुन पेच निर्माण झाल्यावर शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आणि राष्ट्रवादी-काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, तोच फॉर्म्युला बिहारमध्ये वापरण्याचा तारिक अन्वर यांचा प्लॅन दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंमत दाखवावी, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सत्तांतर घडू शकते, असं आवाहन तारिक अन्वर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केलं.

“बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उशिरा प्रचार सुरु केला. बिहारमध्ये काँग्रेसला मोठी संधी होती. पण संधीचं सोनं करता आलं नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना सर्वत्र लक्ष द्यावं लागतं. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये चांगला प्रचार केला. कपिल सिब्बल यांचं वक्तव्य योग्य नाही” असंही अन्वर म्हणाले.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

“फक्त बिहारच नव्हे तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवरही विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी आमच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालेले आहे. लोकसभा निवडणुकीतही गुजरातमध्ये हेच घडले होत. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी दोन टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे” असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी म्हटले आहे.

“रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे”

दरम्यान, बिहार निवडणुकीत (Bihar Election) भाजपने प्लॅन करुन नितीश कुमार कसे कमकुवत होतील, हे पाहिलं. त्यानुसार त्यांचा प्लॅन यशस्वी झाला. नितीश कुमार यांच्या पक्षाचं बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्व असताना भाजपने आताच्या निवडणुकीत जेडीयूची अवस्था कमजोर केली, अशी टीका तारीक अन्वर यांनी केली आहे. (Tariq Anwar appeals Nitish Kumar to show courage and join hands with Congress)

नितीश कुमार हे पूर्वी एनडीएचे मजबूत नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री होते पण आता भाजप त्यांना भलेही मुख्यमंत्रिपद देईल पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, अशी भविष्यवाणी तारीक अन्वर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा

(Tariq Anwar appeals Nitish Kumar to show courage and join hands with Congress)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.