What India Thinks Today : बिस्किट असो किंवा शॅम्पू, कोरोनानंतर भारतीयांची खरेदीची पद्धत बदलली, नेमकी कशी जाणून घ्या

भारतात कोरोना महामारीनंतर नागरिकांची खरेदीची पद्धत बदलली आहे. आधी लोक महिन्याच्या खर्चानुसार महिन्यातून एकदा सर्व राशन घेण्यासाठी जायचे आणि नंतर कमतरता भरून काढायचे. पण ऑनलाइन वस्तु घेणे हे दहा वर्षांपासून उपलब्ध होत होत्या. मात्र कोविडच्या काळात यामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला.

What India Thinks Today : बिस्किट असो किंवा शॅम्पू, कोरोनानंतर भारतीयांची खरेदीची पद्धत बदलली, नेमकी कशी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 6:55 PM

नवी दिल्ली |  TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या सत्रात, FMCG क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यावर Zydus Wellness चे CEO तरुण अरोरा यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यांनी असेही सांगितले की आता भारतात वस्तूंच्या छोट्या पॅकेजिंगची मागणी वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रमाण कोरोनानंतर वाढल्याचंही ते म्हणाले.

खरेदीची पद्धत बदलण्याची कारणे

कोविडनंतर जगभरात महागाई झपाट्याने वाढली. त्यामुळे जगभरातील पुरवठा साखळी प्रभावित होऊन त्याचा परिणाम जगभरात दिसून आला. महागाईचा सगळ्यांनाच फटका बसला, पण त्याचा सर्वाधिक फटका कमी उत्पन्न गटातील लोकांना बसला. त्याचा लोकांच्या मागणीवर आणि खरेदी पद्धतीवरही परिणाम झाल्याचं तरुण अरोरा म्हणाले.

महागाईमुळे ग्रामीण भागातील मागणीवर परिणाम झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था उंचावत चालली आहे, पण ग्रामीण भागातील लोक आपला खर्च कमी करत आहेत. मोठ्या पाकिटांऐवजी लहान पाकिटांची खरेदी. अशा परिस्थितीत, ई-कॉमर्स, ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापारामुळे त्यांची पोहोच वाढत आहे, परंतु देशातील वस्तूंचा खप कमी होत असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

शहरांमध्ये झपाट्याने वाढली मागणी

तरुण अरोरा यांनी शहरांमधील मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतही स्पष्ट केली. ते म्हणाले की, येथे लोकांचा हॉटेल, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांवर होणारा खर्च वाढत आहे कारण तेथे पैसा येत आहे. परंतु जर आपण एफएमसीजीच्या स्तरावर नजर टाकली तर लोकांमध्ये प्रीमियम उत्पादनांवर होणारा खर्च वाढत आहे, जरी ते कमी प्रमाणात खरेदी करत असले तरीही. ऑनलाइन मार्केटमुळे त्यांना लक्झरी आणि प्रीमियम उत्पादने मिळवणेही सोपे झालं आहे, असं तरूण अरोरा म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.