गड आला पण सिंह गेला! तेलंगणामध्ये विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करत भाजपचा आमदार ठरला जायंटकिलर

Telagna Election Result 2023 : चार राज्याच्या निकाल लागला त्यामधील एका राज्यात काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आलं. काँग्रेस तेलंगणामध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं, मात्र ज्या पठ्ठ्याने काँग्रेसला अभूतपूर्व विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली त्या रेवंत रेड्डी यांचा पराभव झाला आहे. इतकंच नाहीतर विजयी नेत्याने विद्यामान मुख्यमंत्री केसीआर यांचाही पराभव केलाय. कोण आहे तो उमेदवार जाणून घ्या.

गड आला पण सिंह गेला! तेलंगणामध्ये विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करत भाजपचा आमदार ठरला जायंटकिलर
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 11:08 PM

मुंबई : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात विजय मिळवला. तर काँग्रेसने एकमेव तेलंगणामध्ये विजय मिळवला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये मिळालेल्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. मात्र काँग्रेससाठी एक वाईट बातमी आहे. रेवंत रेड्डी यांचा पराभव झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यासोबत रेवंत रेड्डी यांच्यासह (केसीआर) चंद्रशेखर राव यांचा कामारेड्डी मतदार संघातून पराभव झाला आहे. विद्यमान आणि भावी मुख्यमंत्र्यांना भाजपच्या आमदाराने पराभवाची धूळ चारली आहे.

भाजपचा ‘हा’ आमदार ठरला जायंटकिलर

कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी यांनी दोघांचा पराभव करत सर्वांनाच चकित केलं आहे. कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी यांना 66,652 मते मिळाली आहेत. कटिपल्ली यांनी सीएम केसीआर यांचा 6741 मतांनी पराभव केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केसीआर यांना 59, 911 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आहेत. त्यांना 54916 मते मिळाली आहेत.

उत्तर तेलंगणातील कामरेड्डी ही जागा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि नंतर रेवंत रेड्डी यांच्या प्रवेशामुळे चर्चेत आली होती. दोन दिग्गजांमध्ये झालेल्या लढतीत येथून भाजपचे उमेदवार कटिपल्ली व्यंकट रमण रेड्डी विजयी झाले. 2018 च्या निवडणुकीत बीआरएस उमेदवार गम्पा गोरवधन यांनी ही जागा जिंकली होती. याआधी 2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसने येथून विजय मिळवला होता, मात्र 2023 मध्ये आता भाजपने जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत कट्टीपल्ली वेंकट रमना रेड्डी यांंचं अभिनंदन केलं आहे.  केसीआर आणि रेवंत रेड्डी विधानसभेवर असणार आहेत. दुसऱ्या मतदार संघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती तिथे ते विजयी झाले आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.