तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून कोल्लूरमध्ये डिग्निटी हाउसिंगचं उद्घाटन!

मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानिमित्त आणि उद्घाटन कार्यक्रमानिमित्त एक फोटो प्रदर्शनी लावण्यात आली आहे. या प्रदर्शनात राज्याची राजधानी हैदराबादच्या आसपास या योजनेद्वारे बनवण्यात आलेल्या भूखंडाची माहिती देण्यात आलीये

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून कोल्लूरमध्ये डिग्निटी हाउसिंगचं उद्घाटन!
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 6:42 PM

हैदराबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी संगारेड्डी जिल्हातील पथानचेरू येथील कोल्लूर क्षेत्रातील जीएचएमसीच्या डिग्निटी हाउसिंग कॉलनीचे उद्घाटन केले. देशातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक क्षेत्रात 15660 ‘2 बीएचके’ घरं आहेत. 111 एकर मध्ये हे घरं बनवण्यात आलीये, हा भाग 2.5 किलोमीटर मध्ये पसरलाय. या कॉलनीच्या योजनेसाठी 1489.29 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या भव्य दिव्य कॉलनीत 117 ब्लॉक असून 560 वर्ग फुट क्षेत्रात पसरलेला आहे. या क्षेत्रातील 25 टक्के जागा झाडे लावण्यासाठी आणि खेळाचे मैदान बनवण्यासाठी राखीव ठेवण्यात आलीये.

या परिसरात सायकलसाठी आणि जॉगिंग ट्रक, ओपन जिम, इनडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलांसाठी खेळाचे मैदान, ओपन थेटर अशा आधुनिक सुविधांसह ही 2 बीएचके हाऊसिंग सोसायटी बनवण्यात आलीये. या आधुनिक सुविधांमुळे सोसायटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

उद्घाटनावेळी, मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव, मुख्य सचिव शांति कुमारी, मंत्री वेमुला केटी रामाराव, हरीश राव, वी.प्रशांत रेड्डी सबिता इंद्रा रेड्डी, मेयर जीएचएमसी विजयालक्ष्मी, सांसद रंजीत रेड्डी, के प्रभाकर रेड्डी, विधायक गुडेम महिपाल रेड्डी, एमएलसी महेंद्र रेड्डी यांच्यासोबत अधिकाऱ्यांनी या सोसायटीचे निरीक्षण केले. विशेष म्हणजे, या सोसायटीत इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन असणार आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लाभार्थांना घराचे प्रमाणपत्र देवून त्यांना घराच्या चाव्या सोपवल्या.

मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानिमित्त आणि उद्घाटन कार्यक्रमानिमित्त एक फोटो प्रदर्शनी लावण्यात आली आहे. या प्रदर्शनात राज्याची राजधानी हैदराबादच्या आसपास या योजनेद्वारे बनवण्यात आलेल्या भूखंडाची माहिती देण्यात आलीये. यात एकूण 1 लाख घरं बनवण्यात आलीये. हैदराबादमध्ये 13 भूखंडातील 38 स्थानांवर 9453 भागांचे निर्माण करण्यात आले आहे. रंगा रेड्डी येथे 6 भूखंडाच्या 30 स्थानांवर 23908 घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. मेडचल मल्काजगिरि येथे 38419 घरांचे निर्माण 33 स्थानांवर 4 खंडात केल आहे, तर संगारेड्डीच्या 10 क्षेत्रात 28220 घरांचे निर्माण करण्यात आले आहे. के. चंद्रशेखर राव सरकारीची ही महत्वाची योजना आहे

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.