Telangana Pay Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट 30 टक्के पगारवाढ, निवृत्तीचं वयही 61!

तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तेलगणातील तब्बल 9 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Telangana Pay Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट 30 टक्के पगारवाढ, निवृत्तीचं वयही 61!
तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात 30 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 6:44 PM

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तेलगणातील तब्बल 9 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. फक्त पगारवाढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना अजून एक भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरुन 61 करण्यात आलं आहे.(30 per cent pay hike for Telangana government employees, retirement age 61)

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सकाळी विधानसभेत ही घोषणा केली आहे. वरिष्ठ IAS अधिकारी सी. आर. बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली 2018 मध्ये बनवण्यात आलेल्या 11th Pay Revision Commissionच्या सूचनांवर विधानसभेत चर्चा करण्यात आलं. यापूर्वी तेलंगणा सरकारने 2014 मध्ये Pay Revisionची घोषणा केली होती. 2014 मध्ये तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन 43 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती.

मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळं सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य सरकारचीही आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या निर्णयाला अजून वेळ लागला. आता परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळीही जोरात!

केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळीही यंदा जोरात साजरी होणार आहे. कारण सरकारने त्यांच्यासाठी स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीमची (Special Festival Advance Scheme) घोषणा केलीय. या स्कीममध्ये सरकारने 10 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आता सणावारांसाठी 10 हजार रुपये अॅडव्हान्स घेऊ शकतात. त्यावर कुठलंही व्याज आकारलं जाणार नाही. याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या तारखेपूर्वी या स्कीमचा लाभ घेतला जाऊ शकतो.

तामिळनाडूतही निवृत्तीचं वय 60 वर्षे

तामिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे. पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत ही घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या :

तामिळनाडूत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याचं वय ६० वर्षे, महाराष्ट्रात काय स्थिती?

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

30 per cent pay hike for Telangana government employees, retirement age 61

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.