तेलंगणाच्या आदिलाबाद एअरपोर्टला मंजूरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्री जी. किशन रेड्डी यांना लिहीले पत्र
तेलंगणात सध्या केवळ एकच विमानतळ आहे. हैदराबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या बेगमपेट विमानतळावरुन नागरी उड्डाण सेवा जारी आहेत.

केंद्र सरकारने वारंगलच्या ममनूरमध्ये विमानतळाला मंजूरी दिली असतानाच आता तेलंगणात आणखी एक विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय वायू सेनेने आदिलाबाद येथे विमानतळ उभारण्यास तत्वत: मंजूरी दिली आहे. हा निर्णय झाल्यावर ममनूरसह हे राज्याचे तिसरे विमानतळ ठरेल असे केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे भाजपा अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. किशन रेड्डी यांनी नागरी विमान तळाला मंजूरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरिक विमानन मंत्री राम मोहन नायडू यांना धन्यवाद म्हटले आहे.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ( एएआय ) अलिकडेच ममनून येथे विमानतळाचा विकास करण्यास मंजूरी दिली आहे. निजामच्या कार्यकाळात जेव्हा आसफ जाही वंशाने १७२४ ते १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थानात राज्य केले, तेव्हा ममनूर आणि आदिलाबाद हवाई धावपट्ट्या चालू होत्या…
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार
क्षेत्रीय संपर्क योजना उड्डाणांतर्गत सुमारे 620 मार्गांपैकी सध्या हैदराबाद येथे सुमारे ६० विमान मार्ग सुरु आहेत. नवीन विमानतळाच्या उभारणीने आणखीन उड्डाण मार्ग उपलब्ध होतील. केंद्र सरकार हवाई भाडे कमी करण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आदिलाबाद वायू सेना प्रशिक्षण केंद्रातून स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. आदिलाबादच्या लोकांचे खूप काळापूर्वीचे स्वप्न सत्यात येणार आहे. कारण आदिलाबाद येथे वायू सेनेची धावपट्टी नागरि विमानन सेवांना सुरु करण्यास तयार असल्याचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून कळवले आहे.




संयुक्तपणे वापर करण्याच्या दृष्टीने विकास
केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी भारतीय वायू सेनेचे अधिकृत माहितीचे एक पत्रक सादर करीत म्हटले की सुरुवातीला आदिलाबाद येथे एक प्रशिक्षण संस्थान स्थापन करण्याची योजना तयार केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ४ एप्रिलला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की भारतीय वायू सेनेच्या मागणीवर विचार करता आदिलाबाद हवाई क्षेत्रातून नागरिक उड्डाण संचालनासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष जी.किशन रेड्डी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला तत्वत:मंजूरी दिली आहे. मंत्री म्हणाले की पत्रात विमान तळाला नागरिक उड्डाणं आणि वायू सेनेच्या विमानासाठी संयुक्तपणे वापर करण्याच्या दृष्टीने विकास करण्याचा सल्ला दिला गेला आहे.
जी किशन रेड्डी यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन केली विनंती
नागरी उड्डाणांसाठी रनवेची निर्मिती, एक सिव्हील टर्मिनलची स्थापना आणि विमानतळाचे एप्रन सारखा अतिरिक पायाभूत सुविधा यांचा विकास करणे अशी कामे केली जाणार आहेत. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी एएआयला आवश्यक जमीन उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि नेत्यांच्या मागणीवरुन जी किशन रेड्डी यांनी याआधीही संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती. आणि २९ जानेवारीला पत्र देखील लिहीले होते.
प्रवाशांना सुविधा आणि व्यापारात वाढ
हैदराबादनंतर वारंगल आणि आदिलाबाद येथे उड्डाण सेवा सुरु झाल्यानंतर तेलंगणाला अधिक विमान मार्गांचा लाभ मिळणार आहे. याचा केवळ प्रवाशांनाच फायदा होईल असे नाही तर व्यापार आणि व्यवसायात देखील वाढ होणार आहे. मध्यम वर्गाला कमी भाड्यात विमान प्रवास करता येणार आहे. आधी आदिलाबाद येथे एकच विमान तळ होता. परंतू त्याचा वापर केवळ सैन्यदलासाठी होत होता. कालांतराने संरक्षणविषयक हालचाली कमी झाल्या. आता या हवाई धावपट्ट्यांना बहाल केल्याने संरक्षण आणि नागरिक उड्डाण असा दोन्हींसाठी वापर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.