Weather Alert | दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी, मुंबईत पारा चढला, जानेवारीतच एप्रिलचा फील
देशात एकीकडे उत्तर भागात रक्त गोठवणारी थंडी पडत आहे. तर दुसरीकडे, मुंबईत पारा वाढत चालला आहे.
नवी दिल्ली : देशात एकीकडे उत्तर भागात रक्त गोठवणारी थंडी पडत आहे (Temperature Increases In Mumbai). तर दुसरीकडे, मुंबईत पारा वाढत चालला आहे. दिल्ली आणि उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजधानीत 3.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत मंगळवारी (12 जानेवारी) यावर्षातील सर्वाधिक 35.3 अश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर आज मुंबईत 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे (Temperature Increases In Mumbai).
मुंबईत एप्रिलसारखी उष्णता
मुंबईत मंगळवारी (12 जानेवारी) यावर्षातील सर्वाधिक 35.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी तामपानात थोडी घट झाली. बुधवारी मुंबईचं तापमान 34.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. वर्षांच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यातच तापमानात मोठी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना जानेवारी महिन्यात एप्रिलच्या दाहकता सहन करावी लागत आहे.
हवामान विभागाच्या सांताक्रूझ स्टेशनवर बुधवारी सर्वोच्च 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जे सामान्यपासून जवळपास 4 अंश सेस्लिअस जास्त होतं.
Mumbai Santacruz Temp on 13 Jan: Min Temp 22°C; +5° above normal Max Temp 34.6°C; +4° above normal
Pl see variation of max (Red line compared with black),min (Purple line with green) temp in last few days as shown below. Both day & night temp continue to be higher; ACs ON ! TC pic.twitter.com/9NRHfY06hX
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 13, 2021
आयएमडीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होते आणि हवेत रागवा जाणवतो. पण, यावर्षी हवेचं पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूतील उष्ण हवेमुळे तापमानात वाढ होत आहे. तर येत्या दोन दिवसात रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडी पडेल.
तुमच्या शहरातील तापमान
पुणे – 19 अंश सेल्सिअस
नाशिक – 19 अंश सेल्सिअस
औरंगाबाद – 21 अंश सेल्सिअस
नागपूर – 18 अंश सेल्सिअस
कोल्हापूर – 21 अंश सेल्सिअस
Temperature Increases In Mumbai
दिल्लीत रक्त गोठवणारी थंडी
उत्तर भारतात सध्या रक्त गोठवणारी थंडी आहे. अनेक ठिकाणी धुकं पाहायला मिळत आहे. पश्चिमी हिमालयाकडून येणाऱ्या थंड हवेमुळे राजधानीचं तापमान 3.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. त्यामुळे हवेतील गारवा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येते चार दिवस असंच तापमान असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पंजाब, हरयाणा, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा काही बाग तसेच उत्तराखंडमध्ये येत्या तीन दिवसात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात महाराष्ट्रातील तापमान कसं असेल?
गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोवा क्षेत्र पावसामुळे जास्त प्रभावित झाले. मात्र, या आठवड्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज स्कायमीटर वेदरच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या आठवड्यात कोकण-गोवा पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल (Temperature Increases In Mumbai).
Observed Tmax today on 13 Jan, clearly indicating very warm, rather hot central India & around including Maharashtra. Tomorrow’s Tmax forecast shown in next fig; NOT MUCH RELIEF. Infact as per IMD GFS guidance, both min/max could remain above normal for coming 5,6 days. So TC Pl. pic.twitter.com/0qfEU0VwiJ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 13, 2021
संबंधित बातम्या :
Weather Report | हवेत गारवा, पण, पाऊस नाही; वाचा राज्याचं संपूर्ण ‘हवामान’
Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत