दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार

केंद्र सरकार आणखी 451 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क बसवणार(Terrorist activities will be exposed immediately)

दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार
दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 4:44 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद्यांविरोधात दंड थोपटले आहेत. दहशतवादी व नक्षलवादी कारवायांचा वेळीच बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार आता इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्क भक्कम करणार आहे. केवळ दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांवर पाळत ठेवणाऱ्या ‘टीएमएस आणि एनएमबी’ नेटवर्कचा देशभरात आणखी 451 ठिकाणी विस्तार केला जाणार आहे. इंटिलिजन्स गॅदरींग ऑपरेशनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने हे काम हाती घेतले आहे. गेल्या वर्षी सुरू केलेली ही मोहिम चालू वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या मध्यावर पूर्णत्वास नेण्याचा सरकारचा निर्धार आहे.(Terrorist activities will be exposed immediately)

देशभरात एकूण 374 ठिकाणी गुप्त नेटवर्क

विविध राज्यांतील पोलिस प्रमुखांशी विचार विनिमय करुन केंद्र सरकारने 475 जिल्ह्यांत नेटवर्कचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. 451 पैकी 175 ठिकाणे आधीच इलेक्ट्रॉनिक इंटेल नेटवर्कशी जोडली गेलेली आहेत. सध्याच्या घडीला देशभरातील 374 ठिकाणी गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित आहे. नवीन ठिकाणी नेटवर्कचा विस्तार केल्यास गुप्तचर यंत्रणा असलेली एकूण 825 ठिकाणे होतील, असे गृह विभागातील संसदीय स्थायी समितीच्या एका अहवालात म्हटले आहे. हा अहवाल 2 फेब्रुवारी रोजी राज्यसभा आणि लोकसभेत सादर करण्यात आला.(Terrorist activities will be exposed immediately)

डेटाबेसवर आधीच मोठ्या प्रमाणावर डेटा अपलोड

काही राज्ये, गुप्तचर यंत्रणा तसेच आणखी काही यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर डेटा याआधीच डेटाबेसवर अपलोड केला आहे. यासंबंधी गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संसदीय स्थायी समितीने अहवाल तयार केला आहे. समितीमध्ये ज्येष्ठ काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांच्यासह राज्यसभेचे 10 आणि लोकसभेचे 21 असे एकूण 31 खासदार आहेत.

दहशतवादासंबंधी माहितीसाठी व्यापक प्रणाली

दहशतवादी कट आणि कारस्थानसंबंधी सावध करण्यासाठी तसेच कारवायांची माहिती अधिकाधिक प्रसारित करण्यासाठी व्यापक प्रणाली कार्यान्वित केली आहे, असेही गृह मंत्रालयाने संसदीय स्थायी समितीला अहवालातून कळवले आहे. रॉ, सीएपीएफ या केंद्रीय यंत्रणा व राज्य पातळीवरील पोलिस व इतर तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आल्यानंतर समितीला संबंधीत प्रणालीची माहिती देण्यात आली आहे. तपास यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे दहशतवादी कारवायांविरोधात वेळीच कारवाई करता आली नाही. या पार्श्वभूमीवरच संसदीय स्थायी समितीने गृह मंत्रालयाला यासंबंधी केंद्रस्थानी राहून आवश्यक ती ठोस पावले उचलण्याची शिफारस केली होती. (Terrorist activities will be exposed immediately)

इतर बातम्या

नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे

महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार मजबुतीने उभं : छगन भुजबळ

मी बंदखोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे ढळढळीत खोटं बोलले : अमित शाह

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.