Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा आणखी एका बिगर कश्मीरीवर हल्ला

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बिगर कश्मीरी नागरिकाचे सोनू शर्मा असे नाव आहे. तो पंजाबमधील पठाणकोटचा रहिवासी आहे. स्थानिक लोकांनी त्याला पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पाच दिवसांत तिसर्‍यांदा बिगर कश्मीरी नागरिकावर हल्ल्याची घटना घडली आहे.

Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा आणखी एका बिगर कश्मीरीवर हल्ला
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:01 PM

श्रीनगर : कश्मीर खोर्‍यात दहशतवादी प्रचंड सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्याकडून हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र केली असतानाच दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र सुरू ठेवले आहे. त्यातही विशेषतः बिगर कश्मीरींना टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात एका बिगर कश्मीरी (Non-Kashmiri) नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केला. त्यात तो नागरिक गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करून फरार झालेल्या दहशतवाद्यांचा पोलिस आणि लष्कराच्या पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. (Terrorists attack another non Kashmiri in Kashmir Valley)

बिगरकश्मीरींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बिगर कश्मीरी नागरिकाचे सोनू शर्मा असे नाव आहे. तो पंजाबमधील पठाणकोटचा रहिवासी आहे. स्थानिक लोकांनी त्याला पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पाच दिवसांत तिसर्‍यांदा बिगर कश्मीरी नागरिकावर हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जम्मू-कश्मीरात रोजगारासाठी आलेल्या बिगर कश्मीरींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कश्मीर खोर्‍यात बिगर कश्मीरींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या टीआरएफने नुकताच केला होता हल्ला

अलीकडेच श्रीनगरच्या ट्यूलिप गार्डनजवळ दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता. त्या स्फोटात ऑटोचालकाचा मृत्यू झाला. जम्मू जिल्ह्याचा नोंदणी क्रमांक असलेल्या व्हॅनच्या चालकाने पार्किंग क्षेत्राजवळ वाहनाचा मागील दरवाजा उघडला. त्यावेळी हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात चुंबकीय आयईडीचा वापर करण्यात आल्याचे टीआरएफने म्हटले आहे. गुरुवारीही दहशतवाद्यांनी सोनू शर्मा या चालकावरच गोळ्या झाडल्या. पुलवामाच्या यादेर परिसरात ही घटना घडली.

कश्मीरी पंडितही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

दहशतवाद्यांनी सोमवारी शोपियाँ जिल्ह्यात एका कश्मीरी पंडितावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात तो पंडित गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी 24 तासांत 4 हल्ले करून संपूर्ण कश्मिर खोरे हादरून टाकले होते. दक्षिण काश्मीरातील शोपियाँ जिल्ह्यातील चित्रगाम येथील रहिवासी असलेल्या कश्मिरी पंडित सोनूकुमार बलजी याने पलायनाच्या वेळी कश्मीर सोडले नव्हते. दहशतवाद्यांनी सोमवारी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. सोनूकुमार 30 वर्षांपासून कश्मीरात राहत आहे. दुसरीकडे श्रीनगरच्या मैसुमा येथील सीआरपीएफच्या कॅम्पवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता, तर एक जवान गंभीर जखमी झाला. लाल चौकाजवळ झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. (Terrorists attack another non Kashmiri in Kashmir Valley)

इतर बातम्या

VIDEO : चालत्या रेल्वेतून उतरताना तोल जाऊन गाडीखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पत्नीचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाल्यानं पतीचा डॉक्टरवर प्राणघातक हल्ला! राजगुरुनगरमधील रुग्णालयात नातलगांची तोडफोड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.