Jammu-Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस चौकीवर हल्ला; दोन पोलीस जखमी

मागील काही महिन्यांपासून कश्मिर खोरे दहशतवाद्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पुन्हा अशांत बनले आहे. सामान्य नागरिकांपासून मजुरांपर्यंत लोकांच्या हत्येचे सत्र घडलेले आहे. विशेषतः परप्रांतियांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. यात कश्मिरी पंडिताचाही समावेश होता.

Jammu-Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस चौकीवर हल्ला; दोन पोलीस जखमी
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोस्ट ऑफीसवर हल्ला
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 5:06 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. एकीकडे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. असे असताना दहशतवादी सुरक्षा दलांना गुंगारा देत हल्ले करु लागले आहेत. सुरुवातीला सामान्य नागरिकांना टार्गेट करणारे दहशतवादी आता पोलिसांवर निशाणा साधत आहेत. आज पुलवामा जिल्ह्यातील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांवरील वारंवारच्या हल्ल्यांमुळे कश्मिर खोऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परिसरात नाकाबंदी वाढवून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

परप्रांतिय मजुरांच्या हत्येचे सत्र

मागील काही महिन्यांपासून कश्मिर खोरे दहशतवाद्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे पुन्हा अशांत बनले आहे. सामान्य नागरिकांपासून मजुरांपर्यंत लोकांच्या हत्येचे सत्र घडलेले आहे. विशेषतः परप्रांतियांच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. यात कश्मिरी पंडिताचाही समावेश होता. त्यानंतर एका दुकानदारावर हल्ला झाला. सततचे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी आता विशेष अभियान हाती घेऊन कारवाया तीव्र केल्या आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ‘ओव्हर ग्राऊंड वर्क्स’ (OGW) पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक हल्ल्यासाठी दहशतवाद्यांपर्यंत प्रत्येक खबर पोहोचवत असतात. दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी या खबरींना ठेचण्याचे विशेष अभियान सुरू आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचा धडाका

याआधी शनिवारी शोपियातील चौगाम परिसरात दहशतवाद्यांची सुरक्षा दलांसोबत तुफान धुमश्चक्री उडाली होती. त्या चकमकीत लष्कर-ए-तोएबाचे दोन दहशतवादी मारले गेले होते. सज्जाद अहमद चेक (ब्रारीपोरा) आणि राजा बासीत नाजीर (शोपिया) अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी अलिकडेच ‘द रेजिस्टेन्स फ्रंट’च्या (टीआरएफ) दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. हे दोघे टीआरएफच्या नावाने लष्कर-ए-तोएबाच्या नव्या हायब्रीड माॅड्युलचा भाग होते. (Terrorists attack post office in Pulwama; Two policemen were injured)

इतर बातम्या

धक्कादायक! आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं

Chhindwada : छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले; 13 भाविक जखमी, तीन जण गंभीर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.