शिंदे यांचे वकील विधाने बदलताय? अनिल देसाई यांचं सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत महत्वाचं विधान काय ?
सलग तिसऱ्या आठवड्यापासून सर्वोच्च न्यायलयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असून आज ही सुनावणी संपणार असल्याची शक्यता अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.
संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : आज सलग तिसऱ्या आठवड्यातील दिसऱ्या दिवसाची महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. आज दुपार पर्यन्त एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचे वकील युक्तिवाद करणार आहे. तर दुपारनंतर ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे आज ही सुनावणी संपेल अशी शक्यता ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात निकाल लागेल अशी शक्यताही अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूनावणीकडे लक्ष लागून आहे. त्यात सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा देखील अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.
अनिल देसाई म्हणाले, सुनावणी दरम्यान अनेक कळीचे मुद्दे आहेत, घटनात्मक पेच आहेत. लोकशाहीवरच प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे ही सुनावणी संपूर्ण देशासाठी महत्वाची आहे. आज सुनावणी पूर्ण होत आहे. निकाल आज येईल असं वाटत नाही.
लोकशाही मजबूत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या वकिलाकडून विधानं वारंवार बदलली जात आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात होतो असं म्हणत आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालय घेईल असंही स्पष्ट मत अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग या तीन्ही संस्था या सुनावणीत आहेत. राज्यपालांची भूमिका आणि निवडणूक आयोगाचा निकालावर आमचे प्रश्न आहेत. विद्यमान अध्यक्षांकडे हे प्रकरण जावे असा युक्तीवाद शिंदें यांच्या वकिलाकडून करण्यात आला आहे.
यात कशा प्रकारे नियंमांचे उल्लंघन झालंय हे आम्ही दाखवून दिले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ तर्क लावत असतात. सरकार पाडणं हा उद्देश होताच पण विभाजन नाही असं म्हणणं हे स्पष्ट करत आहे. शिंदे यांची विसंगती यातून दिसतेय.
इथे अपात्रतेचा दहाव्या अनुसूचीत येते का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही गृहीतकांवर युक्तीवाद त्यांच्याकडून केला गेला. व्हीप बजावला गेला होता तेंव्हा सुनील प्रभू हेच प्रतोद होते. त्याचा व्हीप झुगारला गेला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
असे विविध कळीचे मुद्दे असून त्यावर आज अखेरच्या दिवशी युक्तिवाद होणार असून सुनावणी देखील संपली जाईल असे अनिल देसाई यांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय युक्तिवाद होतो, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड काय म्हणतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.