जनता कर्फ्यूच्या काळात पहिल्यांदाच घडलेल्या 10 गोष्टी

जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (The 10 things happened due to Corona). भारतात जनता कर्फ्यूच्या घोषणेमुळे अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.

जनता कर्फ्यूच्या काळात पहिल्यांदाच घडलेल्या 10 गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 7:33 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात इतर कशाहीपेक्षा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित झालं आहे. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जगभरात त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (The 10 things happened due to Corona). भारतात जनता कर्फ्यूच्या घोषणेमुळे अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी घडल्या आहेत.

1.सर्वत्र बंद असल्यामुळे देशातल्या महामार्गांवर रविवारी (22 मार्च) एकही अपघाताची नोंद झाली नाही. सरकारी आकडेवारीनुसार देशातल्या महामार्गांवर दररोज 1280 अपघात होतात. त्यात 415 लोकांचा मृत्यू होतो. मात्र पहिल्यांदाच एखाद्या दिवशी एकही अपघात न झाल्याची नोंद झाली आहे.

2. इतिहासात पहिल्यांदाच नाशिकमधली नोटप्रेस अर्थात नोटांचा छापखाना बंद केला गेलाय. इथं 2100 कर्मचारी काम करतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत नोटप्रेस बंद असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त नाशिकमध्ये नोटप्रेस आहे. जिथं प्रामुख्यानं पाचशे आणि शंभराच्या नोटांची छपाई केली जाते.

3. मुंबई आणि पुण्यात मागच्या 2 वर्षात पहिल्यांदाच हवेच्या प्रदूषणात घट झाली. दिल्लीनं मागच्या 3 वर्षातली सर्वात स्वच्छ हवा अनुभवली. इतर देशातल्या महत्वाच्या 10 शहरांमध्येही हवा आणि ध्वनी प्रदूषणात कमालीची घट नोंदवली गेली.

4. पिंपरी-चिंचवडमध्ये जनता कर्फ्यूमुळे एकही गुन्हा नोंदवला गेला नाही. पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात बहुदा अशाप्रकारची ही पहिलीच घटना असावी. जनता कर्फ्यूत लोक घरातच राहिल्यामुळे पोलिसांवरही कोणताच ताणतणाव दिसला नाही.

5. सांगली जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एखादा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यानं सीमा बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. सांगलीतले बहुसंख्य लोक हे मुंबई आणि पुण्यात राहतात. त्यामुळे संसर्गाचा फैलावा जिल्ह्यात पसरु नये, म्हणून जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

6. देशातल्या तब्बल 10 राज्यांमध्ये लॉकडाऊन झालंय. त्यामुळे या घडीपर्यंत अपवाद वगळले तर 75 टक्के लोक आपल्या घरातच बंद आहेत. इतर राज्यांनी अद्याप लॉकडाऊन केलेलं नाही. मात्र त्या राज्यांमध्येही काही जिल्हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

7. भारतीय रेल्वेनं आपल्या सर्व प्रवासी गाड्या बंद ठेवल्या आहेत. संपूर्ण देशातली रेल्वेसेवा बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका अहवालानुसार भारतात दररोज 20 हजार 523 रेल्वे गाड्या ये-जा करतात. काही कोटी लोक कोणत्याही वेळी रेल्वेमध्ये असतात. भारत-पाकिस्तान फाळणी, याआधीच्या महामारीच्या साथी आणि दोन्ही महायुद्धांवेळीही भारतीय रेल्वे बंद झाली नव्हती.

8. अमेरिकेत रिक्षा आणि चारचाकी वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांना उत्पादनं थांबवून व्हेंटिलेटर्स बनवण्याचे आदेश दिले गेले आहेत. फोर्ड, जनरल मोटर्स आणि टेस्ला या नामांकित कंपन्यांचा यात समावेश आहे. व्हेंटिलेटर्स आणि इतर आरोग्यविषयक उपकरणं बनवण्यासाठी या कंपन्यांच्या मशिनरी आणि कर्मचाऱ्यांचा उपयोग केला जाणार आहे. एरव्ही युद्धजन्य परिस्थितीत असे निर्णय घेतले जातात. मात्र कोरोनासाठी अमेरिकेनं पहिल्यांदाच युद्ध नसताना असा निर्णय घेतलाय.

9. इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसीरिजच्या व्हिडीओंचा दर्जा घटवण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनमुळे इंटरनेटचा वापर दुपटीनं वाढलाय. त्यामुळे सर्वच इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. जास्त डेटाचा वापर होऊ नये, म्हणून अनेक वेबसीरिजची व्हिडीओ क्वालिटी कमी केली गेलीय.

10. जपानमध्ये यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं स्पर्धा सुरु होण्याआधीच माघार घेतली आहे. एखाद्या विषाणुमुळे, क्रीडा विश्वात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतून एखाद्या देशानं माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, जपान तूर्तास तरी ऑलिम्पिक भरवण्याच्या विचारात आहे.

संबंधित बातम्या :

मोदी सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांना केराची टोपली, राहुल गांधींचा गंभीर आरोप

कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा

जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण

संबंधित व्हिडीओ:

The 10 things happened due to Corona

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.