नवी दिल्ली | 04 जानेवारी 2024 : नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाचपैकी तीन राज्यात आपली सत्ता आणली. कॉंग्रेसने तेलंगणामध्ये यश मिळवले. तर, मणिपुरमध्ये जोरम पीपल्स मूवमेंटने (जेडपीएम) सर्वाधिक जागा जिंकून आपली सत्ता आणली. 2022-23 मध्ये झालेल्या या निवडणुकीसाठी 39 कॉर्पोरेट्सनी सुमारे 363 कोटी रुपये देणग्या म्हणून दिल्या होत्या. यातील सर्वाधिक फंड हा भाजपच्या खात्यात गेला. तर, दुसऱ्या क्रमांकाचा फंड मिळूनही या निवडणुकीत पक्ष हरल्याचे दिसून आले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
ADR च्या अहवालानुसार 34 कॉर्पोरेट्सनी निवडणुकीसाठी 360 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. एका कॉर्पोरेटने समाज इलेक्टोरल ट्रस्टसाठी 2 कोटी रुपये दिले. तर, दोन कंपन्यांनी परिवर्तन इलेक्टोरल ट्रस्टला 75.5 लाख रुपये दिले. ट्रम्प इलेक्टोरल ट्रस्टलाही दोन कंपन्यांनी 50 लाख रुपये दिले आहेत. या अहवालातील आकडेवारीनुसार भाजपला सुमारे 70 टक्के रक्कम म्हणजेच 259.08 कोटी रुपये मिळाले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर ज्या पक्षाला सर्वाधिक निधी मिळाला तो पक्ष आहे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समितीला. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 25 टक्के म्हणजेच 90 कोटी रुपये मिळाले आहेत असे या ADR च्या अहवालात म्हटले आहे.
ADR च्या अहवालानुसार वायएसआर काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर तीन राजकीय पक्षांना मिळून सुमारे १७.४० कोटी रुपये मिळाले. 256.25 कोटी रुपये प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टला दान करण्यात आले. 2021-22 मध्ये भाजपशी तुलना केल्यास पक्षाला 336.50 कोटी रुपये मिळाले. तर, दीड कोटी रुपये समाज इलेक्टोरल ट्रस्टला दिले आहेत. काँग्रेसच्या समाज इलेक्टोरल ट्रस्टला 50 लाख रुपये मिळाले. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने भाजप, बीआरएस, वायएसआर, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला हा निधी दिला होता.