Monsoon : मान्सून देशाच्या उंबरठ्यावर, तापलेल्या धरणीला तृप्त करणारं ढगांचं अच्छादन कसं तयार होतं?

उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हवामान विभागाच्या कार्यालयापासून ते शेतावरील बांधावर एकच चर्चा असते ती म्हणजे यंदा मान्सून केव्हा बरसणार पण आज मान्सून म्हणजे काय हे अनेकांना माहिती नाही. तर मान्सून म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून दिशा बदलणारे वारे आहे. मान्सून हा शब्द अरेबियन असून शेकडो वर्षापूर्वी या दिशा बदलणाऱ्या वाऱ्यालाच मान्सून असे नाव देण्यात आले होते. सहा महिने हे वारे नैऋत्यकडून वाहत असतात तर सहा महिने वारे हे ईशान्यकडून वाहत असतात.

Monsoon : मान्सून देशाच्या उंबरठ्यावर, तापलेल्या धरणीला तृप्त करणारं ढगांचं अच्छादन कसं तयार होतं?
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 6:20 AM

मुंबई : गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्याच्या आगमनाबद्दल चर्चा होत नाही असा एकही दिवस नाही. यंदा (IMD) भारतीय हवामान विभाग आणि (Skymet) स्कायमेट संस्थेने (Monsoon) मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज वर्तवला तर आहेच पण सरासरीपेक्षा अधिक तो बरसेल असेही सांगितले आहे. वाढत्या उन्हापासून अंगाची लाहीलाही झालेल्या नागरिकांपेक्षा खरी उत्सुकता लागली आहे ती बळीराजाला. या मान्सूनवरच भारतीय शेती अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या आगमनापासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सर्वकाही जाणून घेण्यात एक वेगळीच उत्सुकता असते. पण शेती व्यवसयासह इतर उद्योगधंद्यांना संजीवनी देणारा मान्सून तयार तरी कसा होतो याची माहिती असणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे कधी अधिक तर कधी कमी बरसणाऱ्या या मान्सूनबद्दलचे तर्क-वितर्क दूर होण्यास मदत होणार आहे.

मान्सून हा पाऊस नसून वारे

उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हवामान विभागाच्या कार्यालयापासून ते शेतावरील बांधावर एकच चर्चा असते ती म्हणजे यंदा मान्सून केव्हा बरसणार पण आज मान्सून म्हणजे काय हे अनेकांना माहिती नाही. तर मान्सून म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून दिशा बदलणारे वारे आहे. मान्सून हा शब्द अरेबियन असून शेकडो वर्षापूर्वी या दिशा बदलणाऱ्या वाऱ्यालाच मान्सून असे नाव देण्यात आले होते. सहा महिने हे वारे नैऋत्यकडून वाहत असतात तर सहा महिने वारे हे ईशान्यकडून वाहत असतात. नैऋत्यकडून वारे वाहत असताना जो पाऊस बरसतो तोच हा मान्सून. या पावासाचा कालावधी हा साडे चार महिन्याचा असून या दरम्यान होणाऱ्या पावसावरच भारतीय शेती अवलंबून आहे.

मान्सून आला हे असे ओळखा

अनेकदा केवळ मान्सून आला..मान्सून आला असेच आपण म्हणतो. पण हे ठरविण्याचे एक निकष आहेत. केरळामध्ये अशी 14 ठिकाणे आहेत जिथे 10 मे च्या नंतर जिथे दोन दिवस सलग 2.5 मिलीमिटर एवढा पाऊस जर झाला तर किंवा वाऱ्याचा प्रवाह कायम असेल तर मान्सून आल्याचे घोषित केले जाते.

हे सुद्धा वाचा

मोसमी वारे तयार होते तरी कसे?

मोसमी वारे तयार होताना दोन घटक महत्वाचे आहेत. यामध्ये जमिनीचे आणि पाण्याचे तापमान. तर जमिन ही लवकर तापते आणि तेवढ्याच लवकर थंडही होते. तेच पाण्याच्या बाबतीत उलटे आहे. जमिनीचे आणि समुद्रातील पाण्याचे तापमान यामध्ये मोठी तफावत असते. यामुळे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. म्हणजेच जिकडे कमी दाब आहे तिकडे म्हणजेच जमिनीकडे कमी दाबाचे पट्टे तयार होतात. तर समुद्राकडे जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. हवेचे एक वैशिष्ट आहे ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत जाते. म्हणजेच समुद्राकडून ही हवा जमिनीकडे वाहिली जाते. ही हवा म्हणजेच दिशा बदलाणारे वारे तयार होतात. उन्हाळ्यामध्ये जमिन तापते आणि थंड होते तर समुद्रातील पाण्याच्या बाबतीमध्येही असेच होते. तापमान वाढीमुळे जास्त दाबाकडून म्हणजेच समुद्राकडून हवा ही जमिनीकडे वाहत जाते. ही हवा बाष्परुपात वाहून जमिनीकडे आणली जाते म्हणजेच तो मान्सूनचा पाऊस असतो.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.