Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : मान्सूनची सुरवात धिम्या गतीने, अंतिम टप्प्यात कसे राहणार चित्र..! ‘या’ दोन शहरांना झोडपणार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील धरणे ही सततच्या पावसाने यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवल्याने आता पुन्हा धरणांमधील अतिरिक्त पाणी हे नदी पात्रात सोडण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Monsoon : मान्सूनची सुरवात धिम्या गतीने, अंतिम टप्प्यात कसे राहणार चित्र..! 'या' दोन शहरांना झोडपणार पाऊस
आगामी दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी राहणार आहे
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 2:13 PM

पुणे : राज्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय यंदा राज्यभरातील बळीराजाला आला आहे. सध्या (Monsson Season) पावसाळा अंतिम टप्प्यात असून जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ही ओलांडली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी असणार तर (Mumbai- Pune) मुंबई आणि पुण्यात पाऊस हा धो-धो बरसणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून या शहरांमध्ये पाऊस हा सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडे वाहत आहे.तर दुसरीकडे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतोय. यातच गुजरातमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्राकडे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करुन पुणे आणि मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे आता पावसाने हजेरी लावली तरी नदी, नाले, ओढे यांना पाणी येणार आहे. तसेच रस्ते जलमय होणार असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणे ही सततच्या पावसाने यापूर्वीच ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज वर्तवल्याने आता पुन्हा धरणांमधील अतिरिक्त पाणी हे नदी पात्रात सोडण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. पुण्यात दोन दिवस संततधार राहणार आहे.

पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत झालेल्या पावासाच्या जोरावर खरिपातील सर्वच पिके बहरात आहेत. शिवाय आता पाऊस झाला नाही तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र, पाऊस लागूम राहिला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.