कंगनाविरोधात काँग्रेसचा बडा चेहरा, आधी नकार आता होकार; हिमाचल प्रदेशमध्ये काय घडणार?
पाचव्या लिस्टमध्ये कॉंग्रेसने जयपूर लोकसभा मतदार संघातून आधी जाहीर केलेला आपला उमेदवार बदलला आहे. जयपूरमधून आधी घोषीत केलेल्या सुनील शर्मा यांच्या जागी आता माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांना संधी देण्यात येणार आहे. कॉंग्रेसने पाच उमेदवारांच्या सहाव्या यादीत कोटा येथून भाजपाच्या बंडखोर उमेदवार प्रल्हाद गुंजल यांना उमेदवार घोषीत केले आहे.
बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौत हीला भाजपाने आपल्या पाचव्या यादीत लोकसभेचे तिकीट दिल्याने ती आता राजकारणात आपले नशीब आजमाविणार आहे. कंगना हीला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून उतरविण्यात आले आहे. मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी आता निर्णय बदलला आहे. आता त्यांनी कॉंग्रेस पक्षाची इच्छा असेल तर आपण कंगना हीच्या विरोधात लढायला तयार असल्याचे प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. मंडीच्या खासदार असलेल्या प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी असून प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष आहेत.
वयोमानानूसार आपण लोकसभा निवडणूक न लढविण्याची इच्छा कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींना कळविली होती. परंतू जर कंगना रणौत यांच्या उमेदवारीनंतर जर वरिष्ठांनी ही जागा मी लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर आपण ही जबाबदारी अंगावर घेण्यास तयार असल्याचे प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी माझे अंतिम बोलणी झालेली नाहीत. परंतू त्यांचा जो काही निर्णय असेल तो पाळणे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या 5 व्या यादीत हिमाचल येथून दोन नावे
भाजपाने आपल्या पाचव्या यादीत हिमाचल प्रदेशातील दोन जागांवर आपले उमेदवार घोषीत केले आहेत. मंडी येथून बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत तर कांगडा येथून डॉ.राजीव भारद्वाज यांना तिकीट दिले आहे. कंगना हीने गेल्यावर्षीच जाहीर केले होते दैवदयेने सर्वकाही सुरळीत झाले तर मी लोकसभा लढवेन असे जाहीर केले होते. कंगना आणि भारद्वाज यांच्या नावाच्या घोषणेसह भाजपाने सिमला आणि हमीरपूर येथील उमेदवाराच्या नावांची घोषणा केली आहे. हमीरपूर जागेवरून अनुराग ठाकूर आणि सिमला येथून सुरेश कश्यप यांना तिकीट दिले आहे. कॉंग्रेस पक्षाने अद्याप हिमाचल प्रदेशाची यादी जाहीर केलेली नाही.
कॉंग्रेसच्या आतापर्यंत सहा याद्या
कॉंग्रेसने आतापर्यंत सहा याद्या जाहीर केल्या आहेत. पक्षाने पहिल्या यादीत 39 दुसऱ्या यादीत 43 आणि तिसऱ्या यादीत 57 उमेदवार घोषीत केले. तर चौथ्या लीस्टमध्ये 46, पाचव्यात 3 आणि सहाव्या यादीत 5 उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. पहील्या यादीत कॉंग्रेसने केरळच्या वायनाड येथून राहुल गांधी यांना उतरविले आहे. तर चौथ्या यादीत अजय राय यांना वाराणसीतून पीएम मोदी यांच्या विरोधात उतरविले आहे.