BJP MP Sakshi Maharaj : ‘पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात बाण ठेवा’, भाजप खासदार साक्षी महाराजांनी सुचवले ‘सुरक्षेचे उपाय’
उन्नाव (उत्तर प्रदेश) : सध्या देशात हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून वाद सुरू आहे. अनेक राज्यात बुलडोझर कारवाई केली जात आहे. त्यावरूनही आता देशात बुलडोझर राजकारणाच्या नव्या अध्यायाला सुरूवात झाली असून दररोज नव्या वादांना तोंड फुटत आहे. तर महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) आणि पती आमदार रवी राणा (ravee rana) यांनी थेट राज्याच्या […]
उन्नाव (उत्तर प्रदेश) : सध्या देशात हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून वाद सुरू आहे. अनेक राज्यात बुलडोझर कारवाई केली जात आहे. त्यावरूनही आता देशात बुलडोझर राजकारणाच्या नव्या अध्यायाला सुरूवात झाली असून दररोज नव्या वादांना तोंड फुटत आहे. तर महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) आणि पती आमदार रवी राणा (ravee rana) यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच हनुमान चालिसा म्हणा असे आवाहन केले होते. त्यानंतर दोन दिवस राज्यात भाजप विरोधात शिवसेना असा राडा दिसत आहे. त्यात राज्यातील कायदा आणि सुव्यस्था बिघडवल्या प्रकरणी पोलिसांनी राणादाम्पत्याला ताब्यात घेतले आहे. याचदरम्यान देशातील वातारणही बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज (BJP MP Sakshi Maharaj) यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी पोलिसांना भ्याड म्हटले आहे. तर लोकांना त्यांच्या सुरक्षेचे उपायही सांगितले आहेत.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत
देशात हनुमान चालिसा आणि भोमग्यावरून वाद सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जशाच तसे म्हणत बुलडोझर मॉडेल धावले. त्यानंतर हे बुलडोझर मॉडेल देशभर पसरत गेले. ज्यामुळे देशात धार्मिक तेढ निर्माण झाला आहे. त्यातच आता उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. खासदार साक्षी महाराज हे कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.
घरात कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि बाण
आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडलेल्या साक्षी महाराज यांनी आपल्या नव्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुमच्या गल्लीत, तुम्च्या शेजारी, घरात अचानक गर्दी झाली तर पळून जाण्याचे मार्ग काय? तुमच्याकडे नसेल तर करा. काहीतरी करा. तसेच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अप्रत्यक्षरित्या विशेष श्रेणी चिन्हांचा वापर केला आहे. त्यात कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि बाण आहेत. त्यावरून त्यांनी लोकांनी आपल्या घरात कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि बाण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसांचे भ्याड असे वर्णन
तसेच खासदार साक्षी महाराज यांनी पोलिसांचे भ्याड असे वर्णन केले आहे. तसेच त्यांनी लिहिले की, जेव्हा जमाव तुमच्या घरी येईल तेव्हा पोलिसच कुठल्यातरी अंधारकोठडीत लपून बसतील. जेव्हा लोक जिहाद करून परत जातात, तेव्हा पोलिस त्यांना मारायला येतात. चौकशी समितीसमोर आल्याने हे प्रकरण काही दिवसांत संपेल. अशा पाहुण्यांसाठी, थंड पेयांचे एक किंवा दोन बॉक्स आणि काही बाण प्रत्येक घरात असावेत.