Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती कंपनीने तब्बल 9925 कार परत मागवल्या

ज्या कार परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या कार परत मागवल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.

मारुती कंपनीने तब्बल 9925 कार परत मागवल्या
Image Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 6:52 PM

दिल्ली : देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने तब्बल 9925 कार परत मागवल्या आहेत. या सर्व वाहनांना ब्रेक लागत नसल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ब्रेकच्या समस्यांमुळे कंपनीने या कार रिकॉल केल्या आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर या बाबातची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी देखील कपंनीने विविध कारणांमुळे आपल्या कार दुरुस्तीसाठी रिकॉल केल्या होत्या. कंपनीने जवळपास 10 हजार कार परत मागवल्या आहेत. यामध्ये वॅगन आर, सेलेरिओ आणि इग्निस या कारचा समावेश आहे. तीन हॅचबॅक कारच्या मागील ब्रेक असेंबली पिन भागामध्ये दोष असल्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.

या समस्येमुळे कार चालविताना जास्त आवाज येतो. कारच्या ब्रेकची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. या दोषामुळे कंपनीने गाड्या परत मागवल्या आहेत.

कंपनीने सर्वच वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निस परत मागविलेल्या नाहीत. 3 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या काळात या सर्व कारचे मॅन्युफॅक्चरींग झाले होते.

ज्या कार परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या कार परत मागवल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.

कंपनीच्या सर्व सर्व्हिस सेंटरवर सदोष पार्ट दुरुस्त करण्यासाठी नवीन पार्ट्स उपलब्ध करून दिले जात आहेत. कंपनीच्या वतीने ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे. कंपनीमार्फत मोफत दुरुस्ती करून दिली जात आहे.

वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.