Video : इंदोरमध्ये पुलाचे रेलिंग तोडून दुधडी भरून वाहणाऱ्या नर्मदा नदीत बस कोसळली, 15 ते 20 जण वाहून गेले, काही पोहून किनाऱ्यावर पोहोचले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

या घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रोलिंग ओलंडताना ही दुर्घटना घडली. एवढेच नाहीतर बस ही नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत उलटली. या विचित्र अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये बसचा चक्काचूर झाला असून जो तो नदी लगतचा खडकाळ भाग जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता.

Video : इंदोरमध्ये पुलाचे रेलिंग तोडून दुधडी भरून वाहणाऱ्या नर्मदा नदीत बस कोसळली, 15 ते 20 जण वाहून गेले, काही पोहून किनाऱ्यावर पोहोचले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
खळघाट येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे रोलिंग तोडून बस नदीत कोसळली
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 1:00 PM

इंदूर : मध्यप्रदेशातील इंदोरहून अमळनेर मार्गस्थ होत असलेली (Bus Accident) बस (एम.एच. -40 – 9848) थेट (Narmada River) नर्मदा नदीत कोसळल्याची घटना सोमवारी सकळी घडली आहे. खळघाट येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे रोलिंग तोडून बस नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 15 ते 20 जण हे वाहून गेले आहेत. तर काहींना पोहत नदीचा किनारा गाठला आहे. महाराष्ट्र रोडवेजची ही बस असून ती इंदोरहून अमळनेर निघाली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  (Rescue operation) बचावकार्यास सुरुवात केली आहे. शिवाय खरगोन येथील डीएम आणि पोलीस अधीक्षक यांनीही घटनास्थळी धाव घतेली आहे. नदीतून आतापर्यंत 13 मृतदेह हे बाहेर काढण्यात आले आहेत तर 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे.

अशी घडली दुर्घटना

या घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रोलिंग ओलंडताना ही दुर्घटना घडली. एवढेच नाहीतर बस ही नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत उलटली. या विचित्र अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये बसचा चक्काचूर झाला असून जो तो नदी लगतचा खडकाळ भाग जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता. शिवाय पोलिसांनी बचाव कार्याला लागलीच सुरवात केली होती. त्यामुळे बचावकार्य संपल्यानंतरच सर्वकाही समोर येणार आहे.

बसमध्ये 55 प्रवासी

इंदोरहून अमळनेर निघालेल्या या बसमध्ये 55 प्रवासी होते. खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर 55 प्रवाशी बसमध्ये होते. नदीच्या खडकावर बस आदळून पुन्हा नदीत उलटल्याने अपघाताची तीव्रता वाढली. यामध्ये 15 ते 20 जण हे वाहून गेले आहेत. तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, 5 ते 7 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु केले आहेत.

पोलिसांकडून बचावकार्य सुरु

घटनेची माहिती मिळताच खरगोन-धारचे डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य करणारे बचावकर्ते बसमध्ये अडकून नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. शिवाय 15 जणांना वाचवण्यातही पोलिसांना यश आले आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भावपूर्ण श्रध्दांजली

इंदोर-अमळनेर ही बस मध्यप्रदेशातील खालघाट येथील पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. धार जिल्हाधिकारी आणि एस.टी प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना म्हणत त्यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

चालक वाहक दोघेही संपर्काबाहेर

या दुर्घटनेनंतर चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक क्र. 18603) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (क्र. 8755) या दोघांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला मात्र, त्यांना सपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे आणखी चिंतेत भर पडली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.