नवजाताचा मृत्यू, एम्ब्युलन्स मिळेना, कोणी बसमध्येही घेईना, मग बाळाला पिशवीत ठेवून केला प्रवास

आजारी आणि अशक्त असल्याने त्याला दुसऱ्या दिवशी जबलपुरच्या रुग्णालयात हलविण्याचे आदेश मिळाले. जबलपूर मेडीकल कॉलेजात त्याला दाखल केले गेले परंतू...

नवजाताचा मृत्यू, एम्ब्युलन्स मिळेना, कोणी बसमध्येही घेईना, मग बाळाला पिशवीत ठेवून केला प्रवास
jabalpur Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 8:56 PM

जबलपूर : आपल्याकडे गरीबांसाठी अनेक कल्याणकारी आरोग्य योजना ( Health schemes ) सुरु असल्याचे दावे सरकार करीत असते. परंतू एका बापाला त्याच्या ( Baby infant  ) नवजात शिशूच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची साधी एम्ब्युलन्सही मिळू नये अशी लाजीरवाणी पुन्हा घडली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर ( MP Jabalpur ) एका दुर्दैवी पित्यावर सरकारी बेफिकीरीने आपल्या नवजाताचे कलेवर पिशवीत घालून दीडशे किमीचा प्रवास करावा लागला असल्याची घटना पुन्हा घडली आहे.

दींडौरीच्या सहजपुरीचे रहीवासी सुनील धुर्वे यांची पत्नी जमनी हीला 13 जूनला जिल्हा रुग्णालयात बाळ झाले. आजारी आणि अशक्त असल्याने त्याला दुसऱ्या दिवशी जबलपुरच्या रुग्णालयात हलविण्याचे आदेश मिळाले. जबलपूर मेडीकल कॉलेजात 15 जूनला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला शव वाहण्यासाठी वाहन द्यावी अशी मागणी केली होती, परंतू ते नसल्याने तसेच खाजगी वाहनासाठी पैसे नसल्याने आम्ही शव थैलीत घालून आणल्याचे जमनीच्या मोठ्या बहिणीने सांगितले.

डीस्चार्जच्या वेळी जीवंत होते…

जबलपूर रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. संजय मिश्रा यांनी सांगितले की हे बाळ वजनाने कमी होते. त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. जबलपूरच्या एसएनसीयूत बाळाला भरती केले होते. परंतू पालकांनी डीस्चार्ज मागितल्याने त्यांना डीस्चार्ज ऑन रिक्स्वेस्टवर सोडले. आम्ही त्याला डीस्चार्ज दिला तेव्हा ते जीवंत होते. कदाचित डीहाड्रेशमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा दावा त्यांनी केला.

मजबूरीने पाऊल उचलले

वैद्यकीय महाविद्यालयातून एका ऑटो रिक्षामध्ये नवजात बाळाचा मृतदेह ठेवून नातेवाईकांनी कसेतरी जबलपूर बसस्थानक गाठले. आणि मृतदेहासह बसमध्ये प्रवेश देण्यास बसचालकाने नकार दिला. अखेर मजबूरीने त्यांनी शव एका पिशवीत लपवून दुसऱ्या एका बसमधून 150 किलोमीटरचा प्रवास केला. आणि रात्री उशिरा दिंडोरी येथे कसेबसे पोहचले. बाळाचे शव पिशवीत ठेवून नातेवाईकांची वाट पाहत दिंडोरी बसस्थानकात इकडे तिकडे भटकत होते, मात्र दिंडोरीमध्येही त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.