होळीचा सण भारतातच नाही तर या देशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो
होळीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भारतातील वेगवेगळ्या राज्यात होळीचा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. महाराष्ट्रातील होळी आणि उत्तर भारतातील होळीचा सण अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. परंतू परदेशातही वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.
मुंबई | 8 मार्च 2024 : होळीचा सण देशभरात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात आदल्या दिवशी होळी पोर्णिमेला होलिका दहन केले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणजे धुळवड केली साजरी केली जाते. कोकणात तर होळीचा सण आठवडाभर साजरा केला जातो. होळीचा सण उत्तरेकडील राज्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भारतातच नाही तर परदेशातही होळीचा सण साजरा केला जातो. तेथे या सणाला वेगळे नाव दिलेले असते. तर पाहूयात भारताशिवाय आणखी कोणत्या देशात होळी आणि धुळवड साजरी केली जाते.
नेपाळमधली होळी
नेपाळमध्येही देखील होळीचा सणाला खूप महत्वाचे मानले जाते. नेपाळी भाषेत होळीला ‘फागु पुन्हि’ नावाने ओळखले जाते. नेपाळमध्ये सुमारे 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. नेपाळमध्ये होळीला फाल्गुन पूर्णिमा देखील म्हटले जाते. जसे भारतातील वेगवेगळ्या राज्यात होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच नेपाळमध्येही होळीचा सण वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. नेपाळी लोक होळीत पाण्याचे फुगे एकमेकांवर मारतात. येथील परंपरेला लोक ‘लोला’ नावे ओळखले जाते.
पाकिस्तानातील होळी
पाकिस्तान जरी भारताचा एक भाग होता.तरी तो 1947 नंतर वेगळा झाल्यानंतरही भारतीय सण साजरे केले जातात. पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि मुसलमान दोन्ही समुहात होळी साजरी केली जाते. पाकिस्तानात भारतासारखाच रंगांचा हा सण साजरा केला जातो.येथे होळीचा सण भारताहून वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पाकिस्तानात होळीला पुरुष लोक मडक्याला तोडण्यासाठी पिरामिडची निर्मिती केली जाते. जे लोक सामील होत नाहीत ते या मानवी मनोऱ्याला पाडण्यासाठी त्यांच्यावर पाणी, दही आणि दूधसारखे द्रव्य पदार्थ त्यांच्या अंगावर टाकतात. लोक या परंपरेला भगवान कृष्णाला लोणी चोरण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रथेला जोडले आहे.
गुयानाची होळी
गुयाना देशात होळीचा सण महत्वाचा मानला जातो. येथे होळीचा सण ‘फगवा’ नावाने साजरा केला जातो. गुयाना येथे होळीच्या सणाचे महत्व इतके आहे की येथे भारतासाठी होळीला राष्ट्रीय सुट्टी असते. गुयाना येथे मुख्य उत्सह प्रसाद नगरातील मंदिरात आयोजित केला जातो. येथे लोक रंग आणि पाण्यासोबत होळी खेळण्यासाठी एकत्र जमतात.
फिजीची होळी
फिजी देशात भारतासारखा होळी नावाचे हा सण साजरा केला जातो. परंतू येथे होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे. भारतीय मुळ असलेले लोक या होळीला लोकगीत, लोक नृत्य आणि रंगाचा सण म्हणून साजरा करतात. यावेळी फिजीत गायल्या जाणाऱ्या लोकगीतांना फाग गायन म्हटले जाते. फिजीमध्ये या सणाला गायली जाणारी गीते भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमातील संबंधावर आधारीत असतात.