Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agnipath Scheme : अग्निपथ होणार सुरू; सेनाप्रमुखांनीच सांगितला प्लॅन कधी करणार योजनेला प्रारंभ

अग्निवीरांची भरती येत्या 90 दिवसांत सुरू होणार असून जुलै 2023 पर्यंत पहिली तुकडी तयार होईल, अशी माहिती आहे.

Agnipath Scheme : अग्निपथ होणार सुरू; सेनाप्रमुखांनीच सांगितला प्लॅन कधी करणार योजनेला प्रारंभ
अग्निपथ योजनाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:12 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) आनलेल्या अग्निपथ योजनेला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यात या योजनेवरून तरूणांच्यामध्ये संतोष दिसत असून तरूण हे रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. तर काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळन लागले. ज्यात तरूणांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या तर काही ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर चक्काजाम केला. त्यानंतर आता अग्निपथ योजनेवरून (Agneepath Yojana) एक बातमी समोर येत असून या बातमीत योजनेची तारिखच सांगण्यात आली आहे. तर लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pandey) यांनी शुक्रवारी सांगितलं की, अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे ट्रेनिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. तर पुढच्या दोन दिवसांत त्याबाबत विविध वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यानंतर आमचे लष्कर भरती घेणारी टीम ही याबाबत निर्णय घेईल आणि त्याची घोषणा करेल. तर अग्निवीरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना संबंधीत भर्ती ट्रेनिंग सेंटरांवर जावं लागेल. तर पहिल्या बॅचचे ट्रेनिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरू होईल. तर प्रत्यक्ष सेवा ही 2023 मध्ये.

कोरोनाच्या कारणाने गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात तरुणांची भरती थांबली आहे. लष्कराने 2019-2020 मध्ये सैनिकांची भरती केली होती. तेव्हापासून सैन्यात सैनिकांची भरती झालेली नाही. दुसरीकडे, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलात गेल्या दोन वर्षांत सैनिकांची भरती झाली आहे. केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी बिहारमध्ये हिंसक निदर्शने झाली. शेकडो तरुणांनी रेल्वे आणि रस्ता रोको केला. त्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने

बुधवारी मुझफ्फरपूर, बेगुसराय आणि बक्सर जिल्ह्यात युवकांनी या योजनेला विरोध केला. त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक रोखून धरली. अग्निवीरांची भरती येत्या 90 दिवसांत सुरू होणार असून जुलै 2023 पर्यंत पहिली तुकडी तयार होईल, अशी माहिती आहे. “अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना सरकारने इतर नोकऱ्यांमध्ये 20-30 टक्के आरक्षण द्यावे,” असे एका आंदोलकाने सांगितले. सशस्त्र दलातील भरती प्रक्रियेत बदल करण्याच्या उद्देशाने अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र विरोधकही याला मोठा विरोध करत आहेत. मात्र, सरकारने अग्निवीरांच्या कमाल वयोमर्यादेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता 17.5 वर्षांपासून 21 वर्षांपर्यंतच्या तरूणांना या योजनेत सहभागी होता येईल. तर सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमिवर यात बदल करण्यात आला असून आता वयोमर्यादा वाढविण्यात आला आहे. आता ही वयोमर्यादा 23 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. तर नोकरीच्या पहिल्या वर्षी 4.76 लाख रूपयांचे पॅकेज मिळणार आहे. जे चौथ्या वर्षांपर्यंत 6.92 लाख रूपयांपर्यंत तो जाईल.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.