लग्नानंतर कोरोनाची लागण, नवरदेव थेट व्हेंटिलेटरवर; आठवड्याभरातच काळानं गाठलं!

सरकारने कितीही जनजागृती केली, निर्बंध आणले तरी विवाह समारंभासारखे कार्यक्रम सर्रास पार पडत आहेत. कोरोना काळात असाच एक विवाह समारंभ थेट नवरदेवाच्याच जीवावर बेतल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. (The groom corona positive at the wedding, death within a week)

लग्नानंतर कोरोनाची लागण, नवरदेव थेट व्हेंटिलेटरवर; आठवड्याभरातच काळानं गाठलं!
लग्नातच नवरदेवाला कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 10:26 PM

मध्य प्रदेश : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. अनेकांचा कोरोनाने बळी घेतलाय. देशात दररोज लाखोंच्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. मास्क लावणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदि नियम पाळण्याचे आवाहन वारंवार सरकार करीत आहे. कोरोनाचे एवढे भयाण वास्तव डोळ्यासमोर असतानाही काही नागरिकांमध्ये याबाबत अजिबात गांभीर्य दिसत नाही. सरकारने कितीही जनजागृती केली, निर्बंध आणले तरी विवाह समारंभासारखे कार्यक्रम सर्रास पार पडत आहेत. कोरोना काळात असाच एक विवाह समारंभ थेट नवरदेवाच्याच जीवावर बेतल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. (The groom corona positive at the wedding, death within a week)

25 एप्रिल रोजी झाला विवाह

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पचोर शहरातील अजय शर्मा नामक 25 वर्षीय युवकाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करीत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला. विवाहाच्या चार-पाच दिवसानंतर अजयला त्रास जाणवू लागला आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

भोपाळमध्ये सुरु होते उपचार

कोरोना युगात लग्न करून एका कुटुंबाचा आनंद उध्वस्त झाला. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका 25 वर्षीय व्यक्तीचा लग्नात कोरोना संसर्ग झाला. भोपाळमधील कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आल्यानंतर अजयवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर एक आठवड्याच्या अपयशी झुंजीनंतर अजयची प्राणज्योत मालवली.

नवरदेवाची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह

अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नूचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने विवाह तेथेच पार पडला. या विवाहात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते. अजयची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह असून कुटुंबातील बाकी सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलनुसार तरुणावर भोपाळमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या राजगढमध्ये विवाह आणि सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र काही लोक सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत चोरुन विवाह करत आहेत. कोरोना काळात थोडासा बेजबाबदारपणा आपल्या आणि कुटुंबाच्या जीवावर बेतू शकतो. (The groom corona positive at the wedding, death within a week)

इतर बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, 22 मे पासून ऑनलाईन अर्ज करा

Video: नाम भी राजीव था..और हम से छीने भी उसी उम्र में गये, सातवांच्या प्रार्थना सभेत प्रियंका गांधींचा हुंदका दाटला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.