नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : देशातील अनेक शहरातच काय गाव खेड्यात पण जमिनीला सोन्याचे दाम मिळत आहे. जमिनीच्या किंमती गेल्या 10-15 वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत. पण हैदराबाद येथील या जमिनीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. शहराच्या इतिहासात ही प्रॉपर्टी सर्वात हॉट (Hyderabad Hot Property) ठरली आहे. तिने प्रशासनाला मोठा महसूल मिळवून दिला आहे. या शहरातील ही सर्वात महागडी जमीन ठरली आहे. शहर प्रशासनाला पण ई-लिलावात (E-Auction) इतका महसूल गाठीशी येईल, असे वाटले नव्हते. पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळाला. तेलंगाणा राज्यातील हा सर्वात महागडा सौदा ठरला आहे. मुंबई, दिल्लीतील महागड्या जागेइतका परतावा हैदाराबाद मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या कोटीला हा सौदा झाला.
इतकी मिळाली किंमत
हैदराबाद शहरात कोकापेट हा नावाजलेला परिसर आहे. येथील नियोपोलिस लेआऊटमधील सात प्रमुख भूखंडांचा ई-लिलाव झाला. हा 45.33 एकरचा परिसर आहे. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) गुरुवारी या ई-लिलावातून मालामाल झाली. प्रशासनाला विक्रमी 3,319.6 कोटी रुपयांची कमाई करता आली.
तेलंगाणातील सर्वात हॉट प्रॉपर्टी
तेलंगाणा राज्यात एक एकर भूखंडासाठीची ही सर्वाधिक बोली ठरली आहे. 100.75 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. या सात भूखंडासाठी सरासरी 73.23 कोटी रुपये प्रति एकर भाव मिळाला. या प्लॉटची सुरुवातीची किंमत 35 कोटी रुपये प्रति एकर इतकी होती.
आनंद पोटात माईना
या सात प्लॉटसाठी गुंतवणूकदारांना सर्वाधिक बोली लावल्याने प्रशासनाने आनंदाने न्हाऊन निघाले. नगरपालिका प्रशासनाचे विशेष मुख्य सचिव, अरविंद कुमार यांनी हा एक विक्रम असल्याची प्रतिक्रिया दिली. यामुळे महसूलात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सात प्लॉटची झाली विक्री
कोकापेटमधील या सात भूखंडाची जागा 3.60 एकर ते 9.71 एकरपर्यंत आहे. हा परिसर एकूण 45.33 एकराचा आहे. त्यांचा लिलाव करण्यात आला. या भूखंडाचे नियोजीत किंमत मूल्य 1,586.50 निश्चित करण्यात आले होते. पण प्रशासनाला या विक्रीतून 3,319.60 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 100.75 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. या सात भूखंडासाठी सरासरी 73.23 कोटी रुपये प्रति एकर भाव मिळाला.
कोणी लावली सर्वाधिक बोली