Hotel Rent : मुंबईत या हॉटेलमध्ये थांबले होते विरोधक, तिथले एक दिवसाचे भाडे तरी किती?

| Updated on: Sep 02, 2023 | 5:54 PM

Hotel Rent : विरोधी पक्षांनी मुंबईत पुन्हा एकजुटीचे प्रदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी देशातील झाडून 28 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक कलिना येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झाली. त्यासाठी हॉटेलच्या 200 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. त्याचे भाडे तरी किती होते

Hotel Rent : मुंबईत या हॉटेलमध्ये थांबले होते विरोधक, तिथले एक दिवसाचे भाडे तरी किती?
Follow us on

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : विरोधी पक्षांची एकजूट पुन्हा मुंबईत दिसली. इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A Alliance) माध्यमातून बिगर भाजपा 28 पक्षांची मोट बांधण्यात आली आहे. ही बैठक दोन दिवस चालली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर तोडगा काढण्यात आला. अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. मीडियातील वृत्तानुसार, ही बैठक कलिना येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) झाली. त्यासाठी हॉटेलच्या 200 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) यांनी ही बैठक यशस्वी करुन दाखवली. यापूर्वीची बैठक बेंगळुरु येथे झाली होती.

30 सप्टेंबरपर्यंत सूटणार तिढा

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात गिव्ह अँड टेक या आधारावर काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत काय फॉर्म्युला ठरला आहे, याविषयी सातत्याने इंडिया आघाडीतील नेत्यांना विचारण्यात येते. त्यावर पण लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत इंडिया आघाडीकडून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसे आहे हॉटेल ग्रँड हयात

हॉटेल ग्रँड हयातच्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली आहे. त्यानुसार बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ हे हॉटेल आहे. हे हॉटेल 10 एकर परिसरात 2004 मध्ये सुरु करण्यात आले. तेव्हापासून व्यावसायिक, उद्योजक, परदेशी पर्यटक आणि बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींचे ते आवडते हॉटेल आहे. शिकागोमधील Lohan Associates ने हॉटेलचे डिझाईन तयार केले आहे. या हॉटेलमध्ये
548 खोल्या आणि इतर सर्व्हिस अपार्टमेंट आहेत. या हॉटेलमध्ये चार रेस्टॉरंट Soma, 55 East, Celini आणि China House आहेत.

किती आहे भाडे

या हॉटेलमध्ये अनेक सुईट, रुम्स आणि अपार्टमेंट आहेत. या हॉटेलमध्ये डिप्लोमॅटिक सुईट, ग्रँड एक्झिक्युटिव्ह सुईट, ग्रँड सुईट किंग, प्रेसिडेंशिअल सुईट, वेरांदा सुईट किंग यांचा समावेश आहे. डिप्लोमॅटिक सुईटचे एका दिवसाचे भाडे 34,500 रुपये आहे, करासह ते 40,710 रुपये होते. प्रेसिडेंशिअल सुईटचे एकादिवसाचे भाडे 2,99,000 रुपये आहे. करासह ते 3,52,820 रुपये होते.

इतर रुम्ससाठी मोजा इतके रुपये

या हॉटेलमध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारच्या रुम्स आहेत. तर आठ प्रकारचे अपार्टमेंट आहेत. या रुमचे एका दिवसाचे भाडे 11,000 रुपयांपासून ते 14,500 रुपयांपर्यंत आहे. करासह त्यासाठी 12,980 रुपये ते 17,110 रुपये मोजावे लागू शकतात. अपार्टमेंटचे भाडे रुमनुसार आहे. वन बेडरुम ग्रँड अपार्टमेंटचे एक दिवसाचे भाडे 34,000 रुपये आहे. तर कर आणि इतर शुल्कासह हे भाडे 40,120 रुपये होते.