पाकच्या उरात धडकी, कश्मीर खोऱ्यात भारताने तैनात केले हे विमान
भारतीय वायू सेनेने यापूर्वीही आपल्या ताफ्यातील विमानांना दुसरीकडे प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. त्यामुळे ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही.
नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : भारतीय वायू सेनेने पाकिस्तानजवळील सीमा भागात केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर खोऱ्यात उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट ) एलसीए ‘तेजस’ या स्वदेशी विमानाची तैनाती करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय पायलट खोऱ्यात या विमानांना उडविण्याचा अनुभव घेणार आहेत.
यापूर्वीही विमानांना प्रशिक्षण
भारतीय वायू सेनेने यापूर्वीही आपल्या ताफ्यातील विमानांना दुसरीकडे प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. त्यामुळे ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली नाही. भारतीय वायू सेना जम्मू-कश्मीर आणि लद्दाखसहीत उत्तर क्षेत्रात दोन्ही केंद्र शासित प्रदेशात आपल्या विमानांना अनुभव येण्यासाठी पाठवित आहेत.
एलसीए मार्क-2 आणि एएमसीएवर नजर
भारतीय वायूसेना विमानांनामध्ये अधिक क्षमता वाढवित आहे. यात स्वदेशी एलसीए तेजस लडाऊ विमानांचा समावेश केला आहे. वायू सेनेची डीआरडीओ द्वारा विकसित केलेल्या एलसीए मार्क-2 आणि मार्क – 2 आणि एएमसीएवर देखील आहे. भारतीय विमानांना पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त प्रयत्नांनी विकसित केलेल्या JF-17 फायटर जेटच्या तुलनेत सरस आहेत.
तेजसचे महत्व काय ?
तेजस हे सिंगल इंजिनचे 6,500 किलोग्रॅम वजनाचे लडाऊ विमान आहे. त्याचे 50 टक्के पार्ट भारतात तयार करण्यात आले आहेत. याविमानाला इस्रायलमध्ये EL/M-2052 रडार लावण्यात आले आहे. ते एकाच वेळी दहा टारगेट ट्रॅक करु आक्रमण करु शकते. या विमानाला छोट्या रनवे वरुन टेक घेता येते. सहा प्रकारची मिसाईल, लेझर गायडेड बॉम्ब आणि कल्स्टर हत्यारांची सोबत देता येऊ शकते. सेल्फ प्रोटेक्शन जॅमरने हे विमान सुसज्ज आहे. त्यामुळे त्याला स्वत: चे संरक्षण करता येते. एकाच वेळी 3000 किमीपर्यंत उड्डाण करु शकते. तेजसचे अत्याधुनिक व्हर्जन तेजस मार्क-2 56 हजार फूटांपेक्षा अधिक उड्डाण घेऊ शकते. हे विमान रशियाच्या मिग – 21 ला पर्याय म्हणून वायू सेनेत कामगिरी बजाऊ शकते असे म्हटले आहे.