दिल्ली : एका आयएएस अधिकाऱ्याची फॅमिली देवप्रयाग ( Devprayag Sangam ) येथील अलकनंदा आणि भगीरथी नदीच्या संगम तटावर गंगास्नानासाठी गेले असता आयएएस अधिकाऱ्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची घटना काल घडली आहे. रेस्क्यू टीमने ( Rescue Team ) त्यांच्याशोधासाठी तातडीने मोहीम सुरु केली असून परंतू त्यांचा काहीही थांगपत्ता न लागल्याने शोध मोहीम सुरुच आहे. आयएएस अधिकाऱ्याची ( Ias Officer ) लेक आणि पत्नी यांच्यासमोरच ही घटना घडल्याने रडून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
हरियाणाच्या कृषि विभागाचे संयुक्त संचालक जगराज डांडी गुरुवारी आपल्या कुटुंबियांसोबत गंगादर्शनासाठी देवप्रयाग येथे आले होते. गुरुवारी ते ऋषिकेशहून देवप्रयाग येथील गंगा संगम तटावर आले होते, त्यांच्या फॅमिलीसह ते अलकनंदा आणि भागीरथी संगम तटावर स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यावेळी ते नदीतील दगडावर पाय ठेवून उभे असताना पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही. पायाखालील दगड घसरून त्यांचा वाहत्या पाण्यात तोल जाऊन ते पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाहून जाताना पाहून त्यांची मुलगी आणि पत्नी यांनी जोरजोराने मदतीसाठी धावा केल्या. त्यामुळे आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलीचा हा गोंधळ पाहून येथील संगम तटावर अंघोळ करणाऱ्यांनी आणि आजूबाजूच्या रहीवाशांनी या घटनेची माहीती पोलीसांना दिली. त्यानंतर देवप्रयाग पोलीस आणि श्रीनगर जल पोलीस तसेच एनडीआरएफची संयुक्त पथकाने शोधकार्य सुरु केले. परंतू सायंकाळी उशीरापर्यंत जगराज यांचा थांगपत्ता लागला नाही. देवप्रयाग ठाणा क्षेत्राचे प्रभारी निरीक्षक देवराज शर्मा यांनी म्हटले सांगितले की डेहराडून येथून 22 सदस्यांची टीम निघाली असून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात येणार आहे.