भारताने केली सर्वात खतरनाक मिसाईलची चाचणी, चीन-पाकिस्तानची अनेक शहरे टप्प्यात
भारताने त्याच्या सर्वात आधुनिक मिसाईलची चाचणी केली आहे. या ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडणाऱ्या या मिसाईलचा टप्पा वाढविण्यात आला आहे. भारत-पाकिस्तानची अनेक महत्वाची शहरे याच्या टप्प्यात आली आहेत
मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : भारतीय वायुसेनेने आपल्या ताफ्यात आणखी एक नवे घातक अस्र दाखल केले आहे. भारतीय वायूसेनेने आपल्या सर्वात खतरनाक शत्रूच्या हृदयात धडकी भरविणाऱ्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. हे मिसाईल रशिया आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार केलेले आहे. या मिसाईलची चाचणी अंदमान-निकोबार बेटांवर जवळ करण्यात आली आहे. मिसाईलने आपल्या टार्गेटला संपूर्ण नष्ट केले आहे. हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान मिसाईल असून ते रडार चकवा देत हल्ला करते.
भारतीय वायू सेनेने दिलेल्या माहीतीनूसार पूर्व तटावर अंदमान-निकोबार बेटांवर ब्रह्मोस मिसाईलच्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करता येणाऱ्या आवृत्तीची यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून मिशनने आपले उद्दीष्ट पूर्ण केले आहे. या क्षेपणास्राच्या चाचणी मागे त्याचा पल्ला वाढविण्याचा उद्देश्य असल्याचे म्हटले जात आहे. या मिसाईलला जमिन, हवा, पाणी कोठूनही डागता येते. ते हवेत आपला रस्ता बदलू शकते तसेच चालत्या-फिरत्या टार्गेटलाही ते भेदते.
450 किलोमीटरचे लक्ष्य साध्य
भारतीय वायु सेनेने आता आपल्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करता येऊ शकणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलचा पल्ला वाढवून 450 किमी केला आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची अनेक शहरे याच्या टप्प्यात आली आहेत. या मिसाईलची लांबी 28 फूट आहे. तर हे 3000 किलोग्रॅमपर्यंत वजन वाहू शकते. विशेष म्हणजे या मिसाईलवर 200 किलोग्रॅमपर्यंत अण्वस्रे देखील लादता येऊ शकतात.
येथे पाहा व्हिडीओ –
#WATCH | IAF recently carried out a successful test of its Surface to Surface version of the Brahmos Missile near the Eastern Seaboard archipelago. The missile fire was successful and the mission achieved all its objectives.
(Video source: Indian Air Force) pic.twitter.com/5MVleIKC04
— ANI (@ANI) October 11, 2023
सर्वात अत्याधुनिक मिसाईल
ब्रह्मोस मिसाईल जगातील सर्वात वेगवान क्रुज मिसाईल आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या पहिल्या आवृत्तीची चाचणी 24 नोव्हेंबर 2020 रोजी अंदमार -निकोबार बेटांवर करण्यात आली होती. या मिसाईलला चीनच्या विरोधात लद्दाख आणि अरुणाचल प्रदेशात तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय काही सुखोई-30 एमकेआय लढावू विमानात देखील ब्रह्मोस डागण्याची सोय तयार करण्यात आली आहे. एलओसी जवळील विमानतळांवर या मिसाईलचे तैनाती करण्यात आली आहे.