PoK : भारत पाकिस्तानला दिवसा दाखविणार तारे, आता एक घाव दोन तुकडे, जम्मु-काश्मिरला मिळणार गिफ्ट..
PoK : भारत पाकिस्तानला लवकरच दिवसा तारे दाखविणार आहे..पण प्लॅन काय आहे..
श्रीनगर : भारत (India) पाकिस्तानला (Pakistan) दिवसा तारे दाखविणार आहे. पाकव्याप्त काश्मिर (PoK) ही भारताची दुखती रग आहे. पाकिस्तानने बळजबरीने हा भाग कित्येक वर्षांपासून ताब्यात घेतला आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या माकड चेष्टांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण आता पाकिस्तानला धडा शिकविण्यात येणार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मु आणि काश्मीरसह लद्दाखच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात ते श्रीनगर येथे पोहचले आहेत. बडगाम येथील भारतीय सेनेच्या शौर्य दिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले.
पाकिस्तान, कब्जा केलेल्या काश्मिरमधील लोकांवर अत्याचार करत असल्याचे सांगत, त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे.
वृत्त संस्था ANI नुसार, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर अर्थात पीओके (PoK) पुन्हा भारतात सामिल करण्याचे संकेत संरक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
#WATCH | We’ve just started walking North. Our journey will be completed only when we implement the resolution passed unanimously in the Indian Parliament on February 22, 1949, & accordingly reach our remaining parts, such as Gilgit & Baltistan: Defence Minister in Budgam, J&K pic.twitter.com/dM0TRJoEoQ
— ANI (@ANI) October 27, 2022
जम्मू-काश्मिर, लद्दाख या केंद्र शासित प्रदेशांमध्ये सर्वांगिण विकासाचे लक्ष्य तेव्हाच साध्य करता येईल, जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तान मिळविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्र्यांनी या कार्यक्रमादरम्यान दिले.
आता आम्ही उत्तरेच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे. आमची यात्रा तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तान या अंतिम भागापर्यंत आम्ही पोहचू, असे संरक्षण मंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
22 फेब्रुवारी 1949 रोजी भारतीय संसदेने जो ठराव मंजूर केला होता. त्यानुसार, गिलगिट आणि बाल्टिस्तान हा अंतिम भाग भारतात होतात. तेव्हाच आपली यात्रा पूर्ण होईल असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.