राज्यात दंगली उसळू शकतात, म्हणूनच ‘द केरळ स्टोरी’ बॅन; ‘या’ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयालाच दिले स्पष्टीकरण

पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात असलेल्या याचिकेच्या स्पष्टीकरणाबाबत सांगितले आहे की त्या चित्रपटावर बंदी घातली असून या घटनेमुळे कोणत्याही याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले नाही.

राज्यात दंगली उसळू शकतात, म्हणूनच 'द केरळ स्टोरी' बॅन; 'या' राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयालाच दिले स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 1:20 AM

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर राज्यात बंदी घातली आहे.त्यामुळे बंगाल सरकारच्यावतीने आता सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. चित्रपटात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला असून हा चित्रपट बनावट तथ्यांवर आधारित असल्याचेही सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये या प्रकरणी आणखी एक युक्तिवाद करण्यात आला होता की राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने हा चित्रपट प्रदर्शित झाला तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते.

तसेच जातीय सलोखा बिघडू शकतो आणि दंगली भडकण्याची शक्यता असल्याचेही त्या याचिकेत म्हटले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे अनेक सामाजिक समुदायांमध्येही संघर्ष होण्याची शक्यता असल्याचे सरकारकडून प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे.

या परिस्थितीत राज्यात कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि द्वेष आणि हिंसाचाराची घटना घडू नये यासाठी राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपल्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सरकारने म्हटले आहे की, बंदीमागील गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय होता अशीही भूमिकाही मांडण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात असलेल्या याचिकेच्या स्पष्टीकरणाबाबत सांगितले आहे की त्या चित्रपटावर बंदी घातली असून या घटनेमुळे कोणत्याही याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले नाही.

आर्थिक नुकसान हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाऊ शकत नाही असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता बुधवारी या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.