यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर पस्तवाल !, पाहा काय घडामोड होतेय…

यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारला विधी आयोगाने याबाबत हा कायदा कठोर करण्याची शिफारस केली आहे. यासाठीच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबत आयोगाने अहवाल प्रकाशित केला आहे.

यापुढे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर पस्तवाल !, पाहा काय घडामोड होतेय...
public property damage Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 9:44 PM

नवी दिल्ली | 4 फेब्रुवारी 2024 : सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे आता चांगलेच भारी पडणार आहे. हा कायदा कठोर करण्याची शिफारस विधी आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आरोपीकडून जोपर्यंत या मालमत्तेचे मुल्य वसुल केले जात नाही तोपर्यंत अशा आरोपीला जामिनच मिळू नये अशी शिफारस विधी आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. विधी आयोगाने सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण ( पीडीपीपी ) अधिनियमात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ऋतु राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली कमिटीने आपल्या 284 व्या अहवालात ही शिफारस केली आहे.

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना वचक बसविण्यासाठी केंद्र सरकार कठोर कायदा आणण्याच्या विचारात आहे. या संदर्भातील पीडीपीपी अधिनियमात केवळ आरोपींवरील गुन्हा सिद्ध होणे आणि शिक्षेची भीतीच पुरेशी नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना जामिनाच्या अटी आणि शर्ती आणखीन कठोर होणे गरजेचे असल्याचे आयोगाने म्हटले आहे. जोपर्यंत सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई आरोपींकडून केली जात नाही, त्यांना जामीनच दिला जाऊ नये असे आयोगाने म्हटले आहे.

आपल्या देशात सर्वाधिक घटना

केंद्र सरकारने साल 2015 मध्ये पीडीपीपी अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव आणला होता. गृहमंत्रालयाने सार्वजनिक संपत्ती क्षति निवारण अधिनियम ( सुधारणा ) विधेयक 2015 चा मसुदा जारी करीत त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. परंतू मूळ अधिनियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मागे पडला. आपल्या देशात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार सर्वाधिक होतात आणि अजूनही सुरु असल्याचे नाकारता येणार नसल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

कोणालाही परवानगी नाही

सार्वजनिक संपत्तीची सुरक्षा करणे हे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. तसेच सार्वजनिक संपत्तीचे सुरक्षा करणे त्याच्या हिताचे आहे. सार्वजनिक संपत्तीला नष्ट करण्याची कोणालाही परवानगी देता येऊ शकत नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे सोपे आहे. परंतू त्याची निर्मिती करणे अवघड आहे. सार्वजनिक संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती असून यात प्रत्येक नागरिकाचा भागीदारी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकारला पाठविलेल्या अहवालात आयोगाने म्हटले की सार्वजनिक संपत्तीच्या विनाशाला गंभीरतेने घ्यायला हवे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहीजे असेही विधी आयोगाने म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.