रेल्वे रुळांशेजारी किंवा प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे महागात पडणार, नियम काय सांगतो ?
रेल्वेच्या रुळांशेजारी अनेकजण धावणाऱ्या रेल्वे सोबत स्वत:चा मोबाईलवर सेल्फी घेताना मृत्यूमुखी पडले आहेत. अशा प्रकारे सेल्फी घेताना आपण स्वत:चा जीव धोक्यात तर घालतच असतो शिवाय इतरांचे देखील प्राण संकटात टाकत असतो.
रेल्वे रुळांवर चालत्या ट्रेनजवळ काही जण जीव धोक्यात घालून सेल्फी काढत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका तर पोहचू शकतोच शिवाय इतरांचे प्राण देखील धोक्यात येऊ शकतात. तुम्ही अनेकदा सोशल मिडीयावर धावत्या ट्रेनच्या शेजारी सेल्फी घेतानाचे व्हिडीओ पाहीले असतील. असे व्हीडीओ काढताना नशीबाने तुम्ही वाचला तर तुमच्या धाडसाचे कौतूक होऊन तुम्हाला जास्त लाईक मिळत असतील. परंतू असे केल्याने आता तुम्हाला तुरुंगवारी देखील होऊ शकते. तुमचा मोबाईल फोन जप्त देखील होऊ शकतो.तुमच्यावर अनेक कलमानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्हाला दंड भरण्यासह जेलची हवा देखील खायला मिळू शकते.
रेल्वेच्या सध्याच्या नियमाप्रमाणे रेल्वे रुळाच्या शेजारी किंवा प्लॅटफॉर्मच्या किनारी सेल्फी घेतान सापडला तर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.देशातील सर्व रेल्वे स्थानके आणि परिसरात रेल्वेचा अधिनियम 1989 लागू होतो. या अधिनियमात वेगवेगळे गुन्हे केल्या विविध प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेताना पकडले गेल्यास एक हजार रुपायांचा दंह होतो.त्यासह सहा महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.तसेच या शिक्षेच्या विरोधात अपिल देखील रेल्वेच्या न्यायालयात करता येते.
सेल्फी महत्वाचा नाही
रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 145 आणि 147 अशा प्रकारचे नियम तोडणाऱ्या विरोधात विविध शिक्षेची तरतूद केलेली आहे. रेल्वेच्या परिसरात जीव धोक्यात घालून सेल्फी घेताना कोणी सापडले तर त्याच्यावर या रेल्वे सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाते. त्यामुळे येथून पुढे रेल्वे परिसरात जीव धोक्यात घालून सेल्फी घेताना विचार करा. रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वे वारंवार अनाऊन्समेंट करुन रेल्वेच्या परिसरात घ्यावयाच्या काळजी संदर्भात वारंवार प्रवाशांना सावध करीत असते.यात रेल्वे रुळ किंवा प्लॅटफॉर्मवर धोकादायकपणे सेल्फी घेण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुढे सेल्फी घेण्यापूर्वी आपल्या जीवापेक्षा सेल्फी महत्वाची नाही हे ध्यानात घ्या…