“कर्नाटकपेक्षाही 10 पट जास्त प्रभावी प्रस्ताव आणणार”; सीमावादावर या मंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली
सीमाभागाविषयी राज्याची जी भूमिका आहे त्याचं विस्तृत चित्र या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
नागपूरः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होऊनही कर्नाटक विधानसभेच महाराष्ट्र विरोधी आणि सीमााभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखवणारा प्रस्ताव पारित केला. त्याविरोधात आता महाराष्ट्र विधानसभेतही जोरदार आवाज उठवला जात आहे. कर्नाटक विधानसभेच प्रस्ताव पारित केल्यामुळे आता महाराष्ट्रातही त्यांच्यापेक्षा प्रभावी आणि 10 पट जास्त चांगला प्रस्ताव पारित करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत असल्याची माहिती समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काल निधन झाल्यामुळे आणि आज शोक प्रस्ताव असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरीली प्रभावी प्रस्ताव आज पारित केला नाही असंही शंभूराज देसाई यांनी सांगितले.
सीमाभागाविषयी राज्याची जी भूमिका आहे त्याचं विस्तृत चित्र या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेच मांडण्यात येणारा हा प्रस्ताव कर्नाटकच्या प्रस्तावापेक्षा दहा पट जास्त चांगला आणि प्रभावीही असणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊनही आणि सीमावाद हा न्यायालयीन लढा असतानाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेच सीमावादावर प्रस्ताव पारित केला.
त्यामुळे सीमाभागातील जनतेच्या भावना दुखावल्या असून त्याविरोधात आम्ही सोमवारी प्रभावी प्रस्ताव मांडणार असल्याची माहितीही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याकडून मांडला जाणाऱ्या प्रस्तावातून नवा कोणताही वाद निर्माण होणार नाही. त्याचबरोबर कोणताही हिंसाचार आणि वाद प्रतिवाद देखील केला जाणार नाही असा प्रस्ताव आम्ही मांडणार आहे अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे.