येथे लपलेले आहे जगातील सर्वाधिक सोने, जर सापडले तर जग दहापट श्रीमंत होईल, शंभर टक्के वाढेल सोन्याचा साठा
सारी दुनिया सोन्या सारख्या मौल्यवान धातूची चाहती आहे. परंतू जगातील महासागराच्या पाण्यातच सर्वाधिक सोने लपलेले आहे. ते जर का मिळाले तर जगाचा इतिहासच बदलून जाईल
नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांना जगात सर्वाधिक मागणी आहे. कोणत्याही संकटात सोनेच कामी येते. सोने तारण ठेवून व्यक्ती किंवा देश संकटातून बाहेर पडू शकतात. जगातील सर्वाधिक सोने कुठे आहे माहिती आहे का ? तुम्हाला वाटेल कुठल्या तरी खाणीमध्ये हे सोने आहे. परंतू हे सोने खाणीमध्ये नसून समुद्रात दडलेले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटने दिलेल्या माहीतीनूसार जगातील सर्वात जास्त सोने समुद्राच्या पाण्यात दडलेले आहे. हे आतापर्यंत खाणीतून खोदून काढलेल्या सोन्यापेक्षा शंभर पट जादा आहे.
समुद्राच्या पाण्यात 20 मिलीयन टन म्हणजेच 2 कोटी टन नैसर्गिक सोने विरघळलेले आहे. जर त्याची किंमत काढायला गेला तर 2017 मध्ये असलेल्या जगाच्या एकूण जीडीपीच्या 10 पट जास्त भरेल इतकी आहे. या सोन्याला समुद्राच्या पाण्यापासून वेगळे करायला यश आले तर जगातील गरीबी एका क्षणात नष्ट होईल असे म्हटले जाते. समुद्राच्या पाण्यापासून सोन्याला वेगळे करणे मात्र अवघड काम आहे. एक लिटर समुद्राच्या पाण्यातील सोन्याचे प्रमाण खूपच कमी आहे, हे एक ग्राम सोन्याच्या 13 अब्ज हिस्स्यांएवढे आहे. ते एका समुद्रापेक्षा दुसऱ्या समुद्रात कमी किंवा जास्त असू शकते.
तंत्र किंवा फार्म्युला नाही
सध्याच्या काळात समुद्राच्या पाण्यापासून सोने वेगळे करणारे कोणतेही तंत्र किंवा फार्म्युला आपल्याकडे नाही. जगातील खाणीमधून आतापर्यंत 2.44 लाख टन सोने काढलेले आहे, जगात खोदकाम करून जेवढे सोने काढले त्याच्यापैकी अधिक सोने गेल्या पन्नास वर्षात काढल्याचे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने म्हटले आहे. आता सुद्धा जमिनीत 57 हजार मे. टन सोने शिल्लक आहे, आतापर्यंत काढलेल्या सोन्याला 23 मीटर रुंद आणि 23 मीटर लांब क्युबमध्ये सामावले जाऊ शकते. 2016 च्या आकडेवारीनूसार चीन, ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांनी सर्वाधिक सोने खोदले आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे, एकुण सोन्याचा सात टक्के हिस्सा उद्योगांसाठी वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक, मेडीसिन, कम्युनिकेशन डीव्हाईस, एअरक्राफ्ट इंजिन, स्पेस क्राफ्ट तयार करण्यासाठी सोने वापरले जाते.