तेलंगणाचा मुख्यमंत्री कोण ? सस्पेंस संपला ? कॉंग्रेसची हे नाव केले निश्चित !

तेलंगणात कॉंग्रेसने सत्ताधारी बीआरएस पक्षाचा पराभव केल्याने आता तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस संपला आहे. आता उपमुख्यमंत्री पद देखील असणार असून त्यासाठी कोणाची निवड होणार हे कळलेले नाही.

तेलंगणाचा मुख्यमंत्री कोण ? सस्पेंस संपला ? कॉंग्रेसची हे नाव केले निश्चित !
revanth reddyImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 8:13 PM

तेलंगणा | 4 डिसेंबर 2023 : पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ तेलंगणाचा विजय आला आहे. दक्षिणेकडील राज्यात कर्नाटक नंतर कॉंग्रेसला तेलंगणाने हात दिला आहे. उत्तरेत मात्र तीन मोठी राज्ये भाजपाला मिळाली आहेत. आता तेलंगणाच्या मुख्यमंत्री कोण होणार हे कॉंग्रेसने निश्चित केले आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या हाती राज्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तेलंगणाच्या एकूण 119 जागांपैकी 64 जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले आहे. बीआरएसने 39 जागांवर आणि भाजपाने 8 जागांवर यश मिळविले आहे.

तेलंगणा राज्यात एकूण 119 जागा असल्याने बहुमताचा आकडा 60 इतका आहे. कॉंग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपाला 13.90 टक्के व्होट मिळाले आहेत. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभेच्या जागेतून भारत राष्ट्र समितीच्या ( बीआरएस ) पी.नरेंद्र रेड्डी यांना 32,000 हून अधिक मतांनी हरविले आहे. विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर रेवंत रेड्डी सीएम पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.

विधानसभा निकालानंतर कॉंग्रेस नेत्यांनी रविवारी ( 3 सप्टेंबर ) सायंकाळी राज्यपालाची भेट घेतली आणि सरकार स्थापण करण्याचा दावा सादर केला. यानंतर सोमवारी ( 4 डिसेंबर ) कॉंग्रेसच्या विधीमंडळ पक्ष दलाची बैठक झाली. या बैठकीत पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले.  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी सांगितले की विधीमंडळ नेते पदाचे पत्र खरगे यांनी पाठविले जाईल. आणि आमदारांनी पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल तो स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांनी यासंदर्भाक एक प्रस्ताव सादर केला त्यास मल्लू भट्टी विक्रमार्क आणि डी. श्रीधर बाबू यांच्या सह वरिष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिले.

बीआरएसची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात

कॉंग्रेसने दक्षिणेतील तुलनेने छोटे राज्य असलेल्या तेलंगातील प्रादेशिक पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या ( बीआरएस ) दहा वर्षांची सत्ता संपुष्ठात आणली आहे. या पराभवानंतर बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. त्यांना नवीन सरकार स्थापण होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.