या देशाच्या संसदेत आहेत सर्वाधिक महिला; महिला आरक्षणानंतर भारताची स्थिती काय?
आगामी लोकसभेसाठी विविध पक्षांनी काही उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने 195 उमेदवारांच्या यादीत 28 महिलांना तिकीट दिले आहे. तर, पश्चिम बंगालच्या TMC ने उमेदवार यादीत 12 महिलांना स्थान दिले आहे.
नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : भारतीय निवडणूक आयोग काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. 2019 प्रमाणेच यावेळीही एप्रिल ते मे महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरवात आली आहे. अशातच राजकीय पक्षांनी पक्षाच्या काही उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. देशात महिलांना आरक्षण दिल्याची महत्वाची घोषणा झाल्यांनतर भारताच्या संसदेत महिला लोकप्रतिनिधीकय संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारताच्या संसदेत एकूण 104 महिला खासदार आहेत. यातील 78 महिला लोकप्रतिनिधी लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत तर राज्यसभेत 24 महिला खासदार आहेत.
आगामी लोकसभेसाठी विविध पक्षांनी काही उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने 195 उमेदवारांच्या यादीत 28 महिलांना तिकीट दिले आहे. तर, पश्चिम बंगालच्या TMC ने उमेदवार यादीत 12 महिलांना स्थान दिले आहे. अशावेळी जगभरातील संसदेत महिलांना किती प्रतिनिधित्व दिले जाते याचा आढावा घेण्यात आला असता महिलांच्या प्रतिनिधीत्वाबद्दल हळूहळू प्रगती होताना दिसत आहे.
आंतर संसदीय संघ IPU ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 26.9 टक्के इतके आहे. म्हणजेच जगातील राष्ट्रीय संसदेतील चारपैकी एक खासदार महिला आहे. जर हेच प्रमाण राहिले तर महिलांना समानता मिळवण्यासाठी 80 वर्षांहून अधिक काळ लागेल असेही या अहवालात म्हटले आहे.
IPU नुसार 2004 पासून हा आकडा 10 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. परंतु, 2014 पासून यामध्ये केवळ तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मार्चमध्ये इतिहासात प्रथमच जगातील प्रत्येक कामकाज संसदेत किमान एक महिला होती असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
जगनिहाय आकडेवारी पाहिली असता अमेरिका या सगळ्यामध्ये आघाडीवर आहे. येथील संसदेत 35.1 टक्के इतके महिलांचे प्रतिनिधित्व आहे. निवडणुक काळात लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे उदाहरण देताना पोलंडच्या 2023 च्या निवडणुकीत गर्भपात हा एक प्रमुख मुद्दा बनला होता. यामुळे सत्ताधारी पक्षाला आपली सत्ता गमवावी लागली, असे आयपीयूच्या अहवालात म्हटले आहे.
कोणत्या देशाने केली चांगली कामगिरी?
जगातील संसदेमध्ये महिलांच्या प्रतिनिधीत्वाचा विचार केला असता या यादीमध्ये मध्य आफ्रिकन देश रवांडा पहिल्या स्थानी आहे. येथील संसदेत 61.3 टक्के महिला आहेत. 2008 मध्ये बहुसंख्य महिला खासदार असलेला रवांडा हा पहिला देश होता. यानंतर क्युबा आणि निकाराग्वा ही नावे आहेत. येथे महिलांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे 56 आणि 52 टक्के आहे.
ब्रिटन, जर्मनी, अमेरिका टॉप 10 मध्ये नाही
जर्मनी, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित देशांचा या यादीत टॉप 10 मध्येही समावेश नाही. जर्मनीची राष्ट्रीय संसद, बुंडेस्टॅग, महिला प्रतिनिधित्वाच्या बाबतीत 184 पैकी 47 व्या क्रमांकावर आहे, असे IPU ने म्हटले आहे. येमेन देशाच्या कनिष्ठ सभागृहात एकही महिला नाही. तर, वरिष्ठ सभागृहात एकच महिला खासदार आहे. नायजेरिया, कतार आणि इराणसारख्या 20 देशांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी महिलांना जागा आहेत. जपानच्या कनिष्ठ सभागृहात केवळ 10 टक्क्यांहून कमी जागा होत्या. पहिला महिला पंतप्रधान असलेला देश हा श्रीलंका होता. मात्र, त्याचीही स्थिती काही चांगली दिसत नाही. या देशात केवळ 5.3 टक्के महिला आहेत.
भारतात परिस्थिती काय आहे?
भारताच्या संसदेत सध्या एकूण 104 महिला खासदार आहेत. यातील लोकसभेत 78 आणि राज्यसभेत 24 महिला खासदार आहेत. याचे प्रमाण 13 टक्के इतके आहे. मात्र, गेल्या वर्षी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने देशाच्या संसदेत महिलांचे अधिक प्रतिनिधित्व पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. याच अंतर्गत लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.