15 ऑगस्टला पंतप्रधान, २६ जानेवारीला राष्ट्रपती का फडकवतात तिरंगा?

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान झेंडावंदन करतील. प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्याची जबाबदारी राष्ट्रपती पार पाडतात.

15 ऑगस्टला पंतप्रधान, २६ जानेवारीला राष्ट्रपती का फडकवतात तिरंगा?
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली : देशात ७६ व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू आहे. १५ ऑगस्टला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतील. स्वातंत्र्याचा उत्साह साजरा केला जाईल. देश स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय पर्व साजरा करेल. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान झेंडावंदन करतील. प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्याची जबाबदारी राष्ट्रपती पार पाडतात. तु्म्ही कधी असा विचार केला का की, असं का होते. समजून घेऊया असं का केलं जाते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्यासाठी नियम वेगवेगळे का आहेत.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्यामध्ये फरक

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. कारण याच दिवसी १९५० ला आपलं संविधान लागू झालं. १५ ऑगस्टला इंग्रजांच्या गुलामीतून आपली सुटका झाली. विशेष म्हणजे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी झेंडा खाली बांधून रस्सीने वर नेली जातो. त्यानंतर झेंडा फडकवला जातो. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानिमित्त हे केलं जातं. प्रजासत्ताक दिवशी झेंडा वर बांधून खोलून फडकवला जातो.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान का करतात ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान झेंडावंदन करतात. १५ ऑगस्ट १९४७ पासून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. त्यावेळी देशात संविधान लागू नव्हता. राष्ट्रपतींनी पदभार ग्रहन केला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. प्रजासत्ताक दिन संविधान लागू झाल्याबद्दल साजरा केला जातो. त्यामुळे राष्ट्रपती झेंडा फडकवतात. कारण राष्ट्रपती हे देशाचे संविधानिक प्रमुख आहेत.

वेगवेगळे ठिकाण

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन लाल किल्यावर फडकवला जातो. येथून पंतप्रधान देशाच्या जनतेला संबोधित करतात. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथ आयोजित केले जाते. येथून मोठी परेड काढली जाते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडावंदन करतात. देशातील नागरिकांना माहिती व्हावी, म्हणून ही माहिती देण्यात आली. देशात असं का घडतं  याचं ज्ञान नागरिकांना असावं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.