नवी दिल्ली : देशातील मोठमोठ्या शहरांची चिंता वाढवणाऱ्या कोरोना विषाणूने आता ग्रामीण भागात कहर वाढवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असून रुग्णसंख्या तसेच कोरोना बळींचे प्रमाण चौपटीने वाढले आहे. ग्रामीण भागांत आधीच वैद्यकीय सुविधांची वानवा, त्यात आता कोरोनाचे थैमान, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आणखी भीषण बनला आहे. ग्रामीण भागांत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांचे जेवढे प्रमाण होते, त्याच्या तुलनेत सध्या कोरोना रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. कोरोना मृत्यूच्या बाबतीतही हीच चिंताजनक आकडेवारी आहे. (The second wave of the corona is highest in rural India; Infections and deaths quadrupled)
कोरोना संसर्गाबाबत ‘मागास प्रदेश अनुदान निधी’ अर्थात बीआरजीएफची आकडेवारी धक्कादायक आहे. बीआरजीएफच्या कक्षेत येणाऱ्या 272 जिल्ह्यांपैकी 243 जिल्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे. या जिल्ह्यांमध्ये 5 मे रोजी 39.16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट होती, त्यावेळी या जिल्ह्यांतील कोरोना संसर्ग तुलनेत नियंत्रणात होता. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाचा आकडा 9.5 लाख रुग्ण इतका होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केवळ संसर्गाचेच नव्हे तर सक्रीय रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्ण अधिक वाढल्यामुळे ग्रामीण भागांतील जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.2 पटीने अधिक आहे. या जिल्ह्यांत सध्याच्या घडीला 7.15 लाख लोक कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्रस्त आहेत. दुसरीकडे या जिल्ह्यांतील कोरोनाचा मृत्यूदरही वाढला आहे. 5 मेपर्यंत 243 जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग होऊन 36,523 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान 16 सप्टेंबर 2020 पर्यंत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींचा आकडा 9,555 वर गेला होता.
बीआरजीएफ अखत्यारित मोडणाऱ्या 272 जिल्ह्यांपैकी जवळपास 54 टक्के जिल्हे हे केवळ पाच राज्यांतील आहेत. यात बिहार (38 जिल्हे), उत्तर प्रदेश (35 जिल्हे), मध्य प्रदेश (30 जिल्हे), झारखंड (23 जिल्हे) आणि ओडिशा (20 जिल्हे) या राज्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता फैलाव विचारात घेऊन केंद्र तसेच राज्य सरकारांनी गावागावांतील आरोग्य सुविधा भक्कम करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अनेक भागांत प्राथमिक उपचार मिळू न शकल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. (The second wave of the corona is highest in rural India; Infections and deaths quadrupled)
मोदी सरकारची नाचक्की, कोरोना नियंत्रणावरुन जगप्रसिद्ध संशोधन साप्ताहिकानंही पिसं काढलीhttps://t.co/RYxqucJJOF#Lancet #ModiGovernment #CoronaUpdates #CoronaVaccination #Election #CoronaWave
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 8, 2021
इतर बातम्या
कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवर हिरावले, क्रीडा विश्वावर शोककळा
Video | घरासमोर येताच आकाश उजळलं, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, नव्या नवरीची ‘रॉयल एन्ट्री’ पाहाच