काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेह
या प्रकारामुळे आंध्र प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेवरील प्रचंड ताण तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची दाहकता उजेडात आली आहे. (The son took the mother's deadbody through the bike as the ambulance was not available)
आंध्र प्रदेश : कोविडमुळे प्राण गमावलेल्या आईचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा रिक्षा न मिळाल्यामुळे एका तरुणाने चक्क आपल्या बाईकवरून मृतदेह 18 किलोमीटर स्मशानापर्यंत नेला. तरुणाने आपल्या भावोजीची मदत घेऊन आईला एखाद्या प्रवाशाप्रमाणेच बाईकवर बसवले होते. मागील सीटवर भावोजी बसून दोघांनी आईचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात नेला. आंध्र प्रदेशातील मन सुन्न करणाऱ्या या प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (The son took the mother’s deadbody through the bike as the ambulance was not available)
अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांची परवड
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. कोरोना महामारीने प्राण घेतलेली 50 वर्षीय महिला मांडासा गावातील होती. या महिलेचे नाव जी चेन्चुला असे आहे. रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना प्रचंड परवड झाली. महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे होती. त्यांची चाचणी करण्यात आली होती. मात्र वेळीच निदान होऊ शकले नाही. परिणामी कोरोनावरील उपचारही झाले नाहीत. यात महिलेची तब्येत आणखी ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पुढे मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका किंवा रिक्षा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठलेच वाहन मिळाले नाही.
अखेर मुलाने आईचा मृतदेह बाईकवरुन नेण्याचे ठरवले व तसे केलेही. वाटेत पोलिसांनी त्यांची बाईक अडवली. पण त्यातही त्यांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका मिळवत बाईक पुढे मार्गस्थ केली. हा प्रकार पाहणाऱ्याचे मन सुन्न केले आहे. दरम्यान आईचा मृत्यू हा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे चा झाल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. सिटीस्कॅनचा रिपोर्ट मिळवण्यासाठी तासन् तास खर्च घालवले. त्यामुळे आईवर वेळीच कोरोनाचे उपचार होऊ शकले नाही असा दावा तरुणाने केला आहे.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे आंध्र प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेवरील प्रचंड ताण तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची दाहकता उजेडात आली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आलेल्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. रुग्णालयाच्या यंत्रणेतील त्रुटी उघडकीस आली असून कोरोनाच्या उशिरा आलेल्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्या महिलेचा अहवाल वेळेत आला असता, तर तिचे कोरोना उपचार वेळेत सुरू होऊ शकले असते. आरटी-पीसीआर नोंदविण्यात सामान्यत: 2 ते 3 दिवस लागतात. चाचण्यांचे अहवाल वेळीच उपलब्ध करण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे. (The son took the mother’s deadbody through the bike as the ambulance was not available)
At a time when fear of #COVIDSecondWave grips #Srikakulam dist, a family was forced to shift the body of a 50 yr old woman on a bike after their attempts to arrange #ambulance to take her back to their hamlet, failed on Monday. She was waiting for test results. @JanaSenaParty pic.twitter.com/5xeg1NUe4R
— Keelu Mohan (@keelu_mohan) April 27, 2021
इतर बातम्या
स्वदेशी फायटर जेट तेजसवर इस्त्रायली मिसाईलची यशस्वी चाचणी, शत्रूचा सहज खात्मा