ताज जळत होतं, पाकिस्तान हसत होता, अखेर टाटा यांनी दाखवली पाकिस्तानला योग्य जागा
26/11 चा मुंबईवर झालेला तो भयंकर दहशतवादी हल्ला. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेलवर हल्ला केला. ताज हॉटेलच्या घुमटाला त्यांनी आग लावली. जळणारे हॉटेल पाहून पाकिस्तानला गुदगुल्या झाल्या. पण, त्याच हॉटेलचे मालक टाटा यांनी पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिलीय.
नवी दिल्ली | 20 फेब्रुवारी 2024 : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. 26/11 चा तो हल्ला कुणीही विसरणार नाही. या क्रूर दहशतवादी घटनेत 166 लोकांचा मृत्यू झाला होता. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या टाटा समूहाचे आयकॉनिक हॉटेल ताज दहशतवाद्यांनी लक्ष केले. धडाधड गोळ्या सुटत होत्या. काही वेळातच दहशतवाद्यांनी त्या प्रसिद्ध हॉटेलच्या घुमटाला आग लावली. घुमट जळू लागला. ते पाहून पाकिस्तानला हसू फुटले होते. टाटा समूहाचे हे प्रसिद्ध हॉटेल या हल्ल्यामुळे बंद पडले. सुमारे वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर नव्या स्वरूपात ताज हॉटेल पुन्हा परदेशी पर्यटकांची सेवा करण्यास सज्ज झाले. मात्र, याच हॉटेलचे मालक टाटा यांनी पाकिस्तानला मोठा दणका देत त्याला त्याची जागा दाखवून दिलीय.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी ओलीस ठेवली होती. तेव्हा टाटा समुहाचे मालक रतन टाटा यांनी एक मोठे विधान केले होते. ‘अशा परिस्थितीत आपण एकत्र उभे राहून अशा दहशतवादी हल्ल्यांशी खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे. नुकसान झालेल्या मालमत्तेचे पुनर्वसन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे ते म्हणाले होते. टाटा यांनी आपल्या विधानानुसार अवघ्या वर्षभरातच ताज हॉटेल पुन्हा पूर्वीप्रमाणे बांधले आणि इथेच टाटांनी पाकिस्तानला पहिला झटका दिला.
पाकिस्तानवर आलीय अशी वेळ
मुंबईवर दहशतवादी हल्ला करून पाकिस्तान त्यावेळी सुखावला होता. पण, आज त्याच पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झालीय. पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी जगताला कोणताही देश पुढे येत नाही. तर, दुसरीकडे त्या हल्ल्याच्या जखमेतून धडा घेत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.
टाटा कंपनीने ओलांडला पाकिस्तानचा जीडीपी
एकेकाळी दहशतवादी हल्ल्यांद्वारे भारताला उद्ध्वस्त करण्याचा मनसुबा रचणारा पाकिस्तान आज स्वतःच अडचणीत सापडला आहे. तर, ज्या टाटा समूहाच्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला करून पाकिस्तान हस्त होता, त्याच टाटा समूहाने पाकिस्तानला आपली स्थिती दाखवून दिली. टाटा समूहातील कंपन्यांचे मूल्य 365 अब्ज डॉलरपर्यंत वाढले आहे. पाकिस्तान देशाचा एकूण जीडीपी 341 अब्ज डॉलर्स इतका आहे. म्हणजे टाटा कंपन्यांच्या एकूण मालमत्तेपेक्षा 24 अब्ज डॉलर कमी पाकिस्तानचा जीडीपी आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसण्याचे काम करत आहे. तर, टाटा कंपनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत करत आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई जाणवत आहे. मात्र, इकडे टाटा लाखो लोकांना रोजगार देत आहेत.