काजव्यांच्या अस्तित्वाला धोका, दिवसेंदिवस संख्या कमी का होत चालली आहे ?
काजव्यांचा महोत्सव भंडारदरा येथे दरवर्षी आयोजित केला जातो. परंतू दिवसेंदिवस काजवे दिसण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. एकूण काजव्यांच्या अस्तित्वावरच मोठे प्रश्नचिन्ह आहे. जर अशाच संख्येने हे जीव नष्ट होत चालले तर पुढील पिढीला काजवे पाहायलाच मिळणार नाही असे म्हटले जात आहे.
अंधारात झाडांवर चमकणारे काजवे तुम्ही कधी ना कधी पाहिले असतील. लहानपणी काजव्यांना पकडून त्यांना काचेच्या बाटलीतही ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. भंडारदरा येथे तर दरवर्षी काजवा महोत्सव साजरा केला जात असतो. मात्र, आपल्या शरीरातून प्रकाश तयार करणारा निसर्गाचा चमत्कार असलेला छोटा कीटक नष्ट होत चालला आहे. त्याच्या अस्तित्वावरच आता मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आता तर जंगलातही काजव्यांचे अस्तित्व कमी झाले आहे. नेमके काजवे का नष्ट होत चालले आहेत पाहूयात…
यामुळे काजव्यांची संख्या कमी
बायो इंडिकेटर्स पैकी एक असलेले काजवे रात्रीचे चमकतात. हे अतिशय लहान असलेले आणि चपटे राखाडी रंगाचे कीटक खूपच चमकताना खूपच सुंदर दिसतात. भंडादरा येथे खास काजव्यांना पाहाण्यासाठी काजवा महोत्सव भरविला जातो. परंतू तेथेही आता यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या किटकांचे डोळे मोठे आणि पंख छोटे छोटे असतात. दोन छोट्या पंखाआधारे ते उडतात. काजवे हे जमीनीच्या आत आणि झाडाच्या सालीमध्ये अंडी घालतात. ते मुख्यत: वनस्पती आणि छोटे कीटक खातात. काजवे पिकांना आणि फळभाज्यांना किटाणूंपासून वाचवतात. परंतू या कजव्यांवर देखील आता मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यास कारण म्हणजे प्रदुषण आणि हिरव्या झाडांची कमी झालेली संख्या आहे.
संशोधनात काय आढळले
काजव्यांबाबत अधिक संशोधन झालेले नाही. भारतीय वन्य जीव संस्थानने ( WII ) या संदर्भात एक संशोधन केलेले आहे. या संस्थेने संशोधकांनी SGRR विद्यापीठाच्या मदतीने एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. दून खोऱ्यात केलेल्या संशोधनात आढळले की जंगलापेक्षा शहरी क्षेत्रात काजव्यांची संख्या तुलनेने खूपच कमी झाली आहे.
वाढते प्रदुषण आणि हिरवी जंगले नष्ट झाल्याने काजव्यांवर अस्तित्वावर संकट आले आहे. हे संशोधन भारतीय वन्य जीव संस्थानचे तत्कालिन वरिष्ठ प्रोफेसर डॉ. वी.पी. उन्याल आणि SGRR यूनिवर्सिटीच जंतू विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ.रयाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च स्कॉलर निधी राणा यांनी हे संशोधन केले आहे. या संदर्भातील प्रबंध देशाच्या प्रतिष्ठीत इंडियन फॉरेस्टर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
काजव्यांच्या सहा प्रजाती संकटात
दून खोऱ्यातील काजव्यांच्या सहा प्रजाती आढळल्या आहेत. येथे काजव्यांची संख्या शहरांपेक्षा खूपच जास्त आहे.शहरात काजव्यांची संख्या जवळपास नसल्यात जमा आहे. यावरुन स्पष्ट होते की वाढत्या प्रदुषण आणि घटत्या जंगलांमुळे काजव्यांच्या अस्तित्वावर संकट आले आहे. ही स्थिती राहीली तर येणाऱ्या पिढ्यांना काजवे दिसणारच नाहीत अशी स्थिती आहे.
भंडादरा काजवा महोत्सव
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभायारण्यात हिरडा, सादडा, बेहडा, जांभूळ यासारख्या झाडांवर काजवा नावाचा किटक पावसाच्या अगोदर मोठ्या संख्येने चमकताना दिसून येतात. हा काळ काजव्यांचा मिलनाचा कालावधी म्हटला जातो. काजव्यांचे जीवनमान जास्तीत जास्त तीन आठवडे असते.